रुग्णालयासमोर पोलिसांत फ्री-स्टाईल हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 05:00 AM2019-11-12T05:00:00+5:302019-11-12T05:00:56+5:30

पोलीस एकमेकांना मारत असल्याचे दृश्य पाहून नागरिक अचंबित झाले होते. एकमेकांना बुटाने मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींना खर्रा देण्यावरुन पोलिसांत वाद झाल्याची माहिती आहे.

Free-style in front of the hospital in police | रुग्णालयासमोर पोलिसांत फ्री-स्टाईल हाणामारी

रुग्णालयासमोर पोलिसांत फ्री-स्टाईल हाणामारी

Next
ठळक मुद्देभंडारातील प्रकार : आरोपींना खर्रा देण्याचा वाद

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आरोपींना घेऊन गेलेल्या दोन पोलिसात फ्री-स्टाईल हाणामारी झाल्याची घटना येथील जिल्हा रुग्णालयासमोर सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. पोलीस एकमेकांना मारत असल्याचे दृश्य पाहून नागरिक अचंबित झाले होते. एकमेकांना बुटाने मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींना खर्रा देण्यावरुन पोलिसांत वाद झाल्याची माहिती आहे.
जिल्हा मुख्यालयातील पोलीस कर्मचारी सोमवारी सकाळी आरोपींना घेवून पोलिसांच्या वाहनाने जिल्हा रुग्णालयात पोहोचले. वैद्यकीय तपासणी आटोपून आरोपींना वाहनापर्यंत आणण्यात आले. मात्र त्यानंतर काही कळायचा आत दोन पोलीस कर्मचारी एकमेकांना शिवीगाळ करीत मारहाण करु लागले. एका पोलिसाने चक्क आपल्या पायातील बुट काढून दुसऱ्याला मारला. तुंबळ हाणामारी सुरु झाली. त्यावेळी उपस्थित पोलिसांनी या दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघेही ऐकण्याच्या मनस्थीतीत नव्हते. हा प्रकार पाहण्यासाठी रुग्णालयासमोर एकच गर्दी झाली होती. आरोपींना पोलीस मारतात, हे नेहमी चित्र पाहणाºया नागरिकांना पोलीस एकमेकांना मारत असल्याचे दिसत होते. नेमके कशावरुन या दोघात वाद झाला हे कळायला मार्ग नसला तरी आरोपींना खर्रा देण्यावरुन वाद झाल्याची माहिती आहे. एका पोलिसाने आरोपीला खर्रा दिल्याने दुसºयाने त्याला मज्जाव केला. त्यातून ही हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावरुन व्हायरल झाला. जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचली.
नागरिकांच्या संरक्षणाची आणि कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असणारे दोन पोलीस एकमेकांना बुटाने मारत होते. अनेकजण या मारहाणीचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करित होते. शहरात दिवसभर पोलिसांच्या हाणामारीचीच चर्चा सुरु होती. या घटनेची माहिती पोलीस दलात होताच एकच खळबळ उडाली. खर्राचे कारण असले तरी नेमके या हाणामारीमागे काय कारण आहे, याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
पोलिसांची प्रतिमा मलीन करणाºया या पोलिसांवर निलंबनाची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ केली असली तरी या प्रकरणात वृत्त लिहीस्तोवर पोलिसांत तक्रार झाली नव्हती. त्यावरुनही उलटसुलट चर्चा सुरु होती. यासंदर्भात भंडारा शहरचे ठाणेदार सुधाकर चव्हाण यांना विचारणा केली असता अद्याप कुणाचीही तक्रार दाखल झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

मारहाण प्रकरणात चार पोलीस निलंबित
भर चौकात गणेवशात हाणामारी केल्याप्रकरणी चार पोलिसांना जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी तात्काळ निलंबित केले. विकास गायकवाड, निलेश खडसे, विष्णु खेडीकर आणि मनोज अंबादे अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत. अंबादे मोटर परिवहन विभागात तर इतर तिघे पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. येथील रुग्णालयासमोर पोलिसांत झालेल्या हाणामारीचा ३० सेकंदाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला याची तात्काळ दखल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेत चौघांनाही निलंबित केले आहे. सदर चौघेही आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी घेवून गेले होते. त्याठिकाणी दोघांमध्ये गणवेशातच कर्तव्यावर असतांना हाणामारी झाली. ही घटना पोलीस दलाची जनमानसातील प्रतीमा मलीन करणारी असल्याने त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे. तसेच या घटनेची सविस्तर चौकशीही करण्यात येणार आहे.

Web Title: Free-style in front of the hospital in police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस