शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

चौरास भागात धानपीक संकटात

By admin | Updated: October 5, 2015 01:03 IST

ऐन पावसाळ्यात जरी पावसाने वेळोवेळी हजेरी लावली असली तरी, परतीच्या पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा होता.

पावसाने दिला दगा : वीज मंडळाचाही अनियमित पुरवठाकोंढा (कोसरा) : ऐन पावसाळ्यात जरी पावसाने वेळोवेळी हजेरी लावली असली तरी, परतीच्या पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा होता. मात्र, पावसाने पाठ फिरविल्याने हातचे धान पीक जाण्याची भीती निर्माण झाली आहे. निसर्गासोबतच वीज वितरण कंपनीनेही शेतकऱ्यांची बोळवण सुरू केली आहे. भारनियमनाच्या नावावर आठ तासदेखील वीज मिळत नसल्याने कृषी पंपधारक शेतकरी चिंतातुर झाला आहे.चौरास भागातील शेतकऱ्यांचे धान पीक मुख्य आहे. मागील तीन वर्षापासून या परिसरात दुष्काळ पडत आहे. यावर्षी देखील पाऊस अत्यल्प पडल्याने चुऱ्हाड, विरली (खं.), पिंपळगाव (नि.), सोमनाळा भागात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. कोंढा परिसरात २३ सप्टेंबरला पाऊस पडला होता. तेव्हापासून पाऊस बेपत्ता झाला आहे. वातावरणात उकाडा वाढला आहे. पाऊस बेपत्ता झाल्याने जमिनी कोरड्या पडल्या आहेत. हलक्या धानाला पुन्हा पावसाची गरज आहे. परतीच्या पावसाची गरज आहे. कोंढा चौरास भागावर आधीच निसर्गाची अवकृपा झाली असताना विजेच्या समस्या वाढल्या आहेत. दररोज फक्त आठ तास थ्री फेस लाईन कृषी पंपधारकांना दिली जात आहे. त्या दरम्यान अनेकदा अनियमिततेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कृषी पंपधारक शेतकरी देखील शेतीला पंपाद्वारे पाणी पुरवठा योग्य प्रमाणात करू शकत नाही. तसेच विजेचे खांब ठिकठिकाणी चुकले असून केबल खराब झाले आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात धानाला पाणी पुरवठा होत नाही. थ्री फेज वीज येणे जाणे वाढले असल्याने कृषी पंप धारक शेतकरी योग्य पाणीपुरवठा करू शकत नाही. त्यामुळे त्यांचे धानपिक नष्ट होत आहे. कोंढा परिसरात डावा कालव्यात पाणी सोडल्याने कालव्याच्या आजूबाजूचे शेकडो शेतकरी इंजिनच्या माध्यमातून शेतीला पाणी देऊन धानपिक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. यावर्षी अपुऱ्या पावसामुळे परिसरातील तलाव, नाले, बोड्या पूर्णपणे भरले नाही. त्यामुळे तलावाच्या बाजूचे शेतकरी तलावाचे पाणी देऊ शकत नाही. अशा अडचणीत शेतकरी सापडला आहे.शेतकरी धानाचे पीक वाचविण्यासाठी धडपड करीत आहे. धानावर किडींचा प्रादुर्भाव आहे. यावर कोणताच उपाय नाही. लोकांनी दोन तीन वेळा फवारणी करून पिकांना संजीवनी देण्याचा प्रयत्न केला. पण काही उपयोग नाही असे दिसते. अशावेळी प्रशासनाने कोंढा चौरास भागाच्या शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)