शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव रेतीच्या टिप्परने घेतला चार वर्षीय बालकाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 05:00 IST

राष्ट्रीय महामार्गावरून जाताना भंडारा शहरातील जिल्हा परिषद चाैकात भरधाव टिप्पर (एमएच ३६ एए १५२३) मागाहून आला आणि राजीव गांधी चाैकाकडे वळायला लागला. त्याच वेळी धक्का लागून दुचाकी टिप्परच्या मागील चाकात आली. तिघेही खाली फेकले गेले. डाव्या बाजूच्या चाकाचा अथर्वच्या ओटीपाेटाला मार लागला. अथर्वला गंभीर दुखापत झाल्याने त्याला भंडारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डाॅक्टरांनी मृत घाेषित केले.

ठळक मुद्देपती-पत्नी जखमी : जिल्हा परिषद चाैकात दुचाकीला धडक

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लग्न साेहळ्यासाठी निघालेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला रेतीच्या टिप्परने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ४ वर्षीय बालक ठार झाला. तर पती-पत्नी गंभीर जखमी झाले. हा अपघात येथील राष्ट्रीय महामार्गावरील जिल्हा परिषद चाैकात मंगळवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडला. अथर्व जनार्धन बावने (४) रा. केसलापूर, ता. माैदा, जि. नागपूर असे मृताचे नाव आहे. तर जनार्धन किसन बावने (३७) आणि माधुरी जनार्धन बावने (३५) अशी जखमींची नावे आहेत.नागपूर जिल्ह्यातील केसलवाडा येथून जनार्धन, पत्नी माधुरी आणि मुलगा अथर्व मंगळवारी सकाळी लाखनी साडभावाच्या मुलीच्या दुचाकी (एमएच४० बीझेड ५७८५)ने लग्न साेहळ्यात सहभागी हाेण्यासाठी जात हाेते.राष्ट्रीय महामार्गावरून जाताना भंडारा शहरातील जिल्हा परिषद चाैकात भरधाव टिप्पर (एमएच ३६ एए १५२३) मागाहून आला आणि राजीव गांधी चाैकाकडे वळायला लागला. त्याच वेळी धक्का लागून दुचाकी टिप्परच्या मागील चाकात आली. तिघेही खाली फेकले गेले. डाव्या बाजूच्या चाकाचा अथर्वच्या ओटीपाेटाला मार लागला. यावेळी परिसरातील नागरिकांनी धाव घेत तिघांनाही भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र अथर्वला गंभीर दुखापत झाल्याने त्याला भंडारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डाॅक्टरांनी मृत घाेषित केले.लाॅकडाऊनच्या काळात रेती वाहतूक माेठ्या प्रमाणात सुरू असून रिकामे ट्रक भरधाव धावतात. त्यामुळे असे अपघात हाेत आहेत. या घटनेचा तपास ठाणेदार लाेकेश कानसे यांच्या मार्गदर्शनात पाेलीस हवालदार इर्शाद खान करीत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे.

लग्नानंतर सात वर्षाने झाला मुलगाबावने दाम्पत्याला लग्नाच्या सात वर्षानंतर मुलगा झाला. त्यांना एक मुलगीही आहे. लाडाकाैतुकाने त्याचे लालनपालन सुरु हाेते. मात्र मंगळवारी रेतीचा ट्रक काळ हाेवून आला आणि अर्थवचा बळी गेला. 

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू