शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रवास भाडे सवलतीसाठी आता ‘आधार’ची सक्ती

By admin | Updated: February 13, 2015 01:03 IST

राज्यातील सर्व घटकांचा सर्वंकष विकास व्हावा, याकरिता एसटी महामंडळद्वारे विविध प्रकारच्या प्रवास भाडे सवलत योजना दिल्या जातात;...

लाखांदूर : राज्यातील सर्व घटकांचा सर्वंकष विकास व्हावा, याकरिता एसटी महामंडळद्वारे विविध प्रकारच्या प्रवास भाडे सवलत योजना दिल्या जातात; मात्र अनधिकृतरीत्या तयार करण्यात आलेल्या बनावट कार्डच्या माध्यमातून या योजनांचा लाभ घेतला जात असल्याने एसटी महामंडळाच्या तिजोरीवर ताण पडत आहे. यावर लगाम लावण्यासाठी एसटी महामंडळ सरसावले असून, प्रवास भाडे सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना यापुढे आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र दाखविणे बंधनकारक राहील. त्याची त्वरित अंमलबजावणी सुरू करण्याचे निर्देश केंद्रीय वाहतूक व्यवस्थापकांनी नियंत्रकांना दिले आहेत. समाजातील विविध सामाजिक घटकांना सामाजिक बांधीलकीच्या नात्याने एसटी महामंडळाद्वारे सुरुवातीच्या कालावधीपासून विविध प्रवास भाडे सवलत योजना प्रदान केल्या जातात. विशेषत: विविध विद्यार्थी वर्गास विविध कारणांसाठी प्रवास भाडे सवलत अनुदेय करून राज्यातील साक्षरतेचे प्रमाण वाढवून राज्याच्या प्रगतीस हातभार लावला आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्य सैनिक, दलितमित्र पुरस्कार्थी, आदिवासी सेवक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार्थी आदींच्या माध्यमातून समाजसेवेचे कार्य करणाऱ्या पुरस्कार्थींना विनामूल्य एसटी प्रवास सवलत प्रदान केली जाते. वयाची ६५ वर्षे पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आणि अंध, अपंग व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींनादेखील एसटी प्रवास भाड्यात सवलत दिली जाते; मात्र जनसेवेचे हे कार्य एसटी महामंडळाच्या अंगलट येत असून, बनावट कार्ड तयार करून सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांचा सुळसुळाट झाला आहे. प्रवास भाड्यात सवलत मिळविण्यासाठी बनावट कार्ड दाखवून प्रवाशांकरवी एसटीला चुना लावला जात असल्याची शेकडो प्रकरणे आढळून आली आहेत. भंडारा विभागातदेखील बनावट कार्डधारक प्रवाशांची कमतरता नाही. अंध, अपंग आणि ज्येष्ठ नागरिक सवलतींचे हजारो बनावट कार्ड आजतागायत अकोला विभागात जप्त करण्यात आलेत. यावर सरसकट लगाम कसण्यासाठी केंद्रीय वाहतूक महाव्यवस्थापकांनी एका परिपत्रकाद्वारे भंडारा विभाग नियंत्रकांना निर्देश दिले आहेत. (तालुका प्रतिनिधी)