कोरोना विरोधात पेटल्या ज्योती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST2020-04-07T05:00:00+5:302020-04-07T05:00:06+5:30

देशासमोर कोरोना विषाणू संसर्गाचे मोठे संकट ओढवले आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत डॉक्टर, पोलीस, पत्रकार, स्वच्छता कर्मचारी यांचे योगदान मोठे आहे.अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या यंत्रणेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा दिपपर्व होता.

The flames lit against Corona | कोरोना विरोधात पेटल्या ज्योती

कोरोना विरोधात पेटल्या ज्योती

ठळक मुद्देतालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद : ठिकठिकाणी एकात्मतेचे दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी देशवासियांना चलो आवो दिया जलाये असे आवाहन केले होते. रविवारी घराघरातील विद्युत दिवे बंद करून पणत्यांचा प्रकाश करण्यात आला. यावरून आम्ही सारे भारतीय एक आहोत असे एकात्मतेचे विराट दर्शन होताना दिसून आले.
देशासमोर कोरोना विषाणू संसर्गाचे मोठे संकट ओढवले आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत डॉक्टर, पोलीस, पत्रकार, स्वच्छता कर्मचारी यांचे योगदान मोठे आहे.अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या यंत्रणेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा दिपपर्व होता. प्रत्येकाच्या मनातला अंधार व भीती दूर करणे, देशाची एकता, कोरोनाला पराभूत करण्याचा संकल्प, अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल व कोरोनाचे युद्ध आम्ही जिंकूच अशा सकारात्मक आशेचा किरण घेऊन संपूर्ण तालुका पणत्यांच्या ज्योतींनी उजळून निघाला होता. रात्री ९ वाजता सुरू झालेला हा दिपपर्व ९ मिनिटांसाठी असला तरी पणत्यांची ही रोषणाई बराच वेळपर्यंत सुरू होती. जणू दिवाळीच साजरी होत असल्याची अनुभूती येत होती.

जणू अनोखा दिपपर्वच
या दिवसाचा इतिहास समस्त भारतीयांच्या सदैव स्मरणात असेल की जेव्हा संपूर्ण जग डगमगत होतं, तेंव्हा भारतात लखलखाट होत होता. देशासमोर कोरोनाचे संकट आहे.एकीकडे लोकं मृत्युमुखी पडत आहेत.तर दुसरीकडे आम्ही दिवे जाळून, हवेत आकाशदिवे भिरकावत दिवाळीसारखा जल्लोष करतोय.अशा संमिश्र प्रतिक्रि या व्यक्त केल्या जात आहेत.

Web Title: The flames lit against Corona