पोहरा ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनेलचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:32 IST2021-01-22T04:32:02+5:302021-01-22T04:32:02+5:30

लाखनी : तालुक्यातील पोहरा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपप्रणित ग्रामविकास पॅनेलचे ११ उमेदवार विजयी झाले आहेत. पोहरा ग्रामपंचायतीत भाजप समर्थित ग्रामविकास ...

Flag of Gram Vikas Panel on Pohra Gram Panchayat | पोहरा ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनेलचा झेंडा

पोहरा ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनेलचा झेंडा

लाखनी : तालुक्यातील पोहरा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपप्रणित ग्रामविकास पॅनेलचे ११ उमेदवार विजयी झाले आहेत.

पोहरा ग्रामपंचायतीत भाजप समर्थित ग्रामविकास पॅनेल व काँग्रेस समर्थित महाविकास आघाडी पॅनेल यांच्यात थेट लढत झाली. यामध्ये प्रभाग क्रमांक १ मधून रामलाल पाटणकर, वैशाली रामटेके, रेखा गायधने, प्रभाग क्रमांक २ मधून यशवंत खेडीकर, दीक्षा गिर्‍हेपुंजे, जयश्री नगरकर, प्रभाग क्रमांक ३ मधून अमरदास बोडणकर, सरिता मांढरे, प्रभाग क्रमांक ४ मधून ओमप्रकाश बोडणकर, अंबाली खेडीकर, प्रतीक्षा वालदे यांनी विजय मिळवला. सर्व विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुदाम शहारे, भाजपचे जिल्हा महामंत्री मंगेश मेश्राम, फारुख छव्वारे, घनश्याम मते, विष्णू गिर्‍हेपुंजे, ईश्वरदास अर्जुनकर, रवी खेडीकर, केशव नगरकर आदी भाजपचे ज्येष्ठ नेते व पदाधिकारी सहभागी झाले होते.

Web Title: Flag of Gram Vikas Panel on Pohra Gram Panchayat