शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणप्रकरणी आरोपीला पाच वर्षांचा कारावास

By admin | Updated: October 16, 2014 23:19 IST

मोकळ्या जागेत स्नानगृह उभारण्यासाठी झालेल्या बांधकामासंदर्भात उद्भवलेल्या वादातून एका इसमाने ४७ वर्षीय महिलेला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश

भंडारा : मोकळ्या जागेत स्नानगृह उभारण्यासाठी झालेल्या बांधकामासंदर्भात उद्भवलेल्या वादातून एका इसमाने ४७ वर्षीय महिलेला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.जे. अकर्ते यांनी तपासाअंती व साक्षीदारांच्या बयानानंतर आरोपी अचित नीळकंठ नंदेश्वर याला पाच वर्षांचा कठोर कारावास व २७ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही घटना दोन वर्षांपूर्वी भंडारा तालुक्यातील डोडमाझरी टेकेपार येथे घडली होती. उर्मिला मनोज शिंगाडे असे या प्रकरणातील जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. डोडमाझरी येथे नंदेश्वर व शिंगाडे यांचे लागूनच घर आहे. घराशेजारील मोकळ्या जागेत बांबू गाडून त्यात पोते व तुराट्या तसेच दगडाचा वापर करून बाथरुम तयार करण्याचे ठरविले. याच प्रकारचे स्नानगृह शिंगाडे यांचे होते. याच बाथरुम जवळ संगम नंदेश्वर याने बाथरुम तयार करण्याकरिता लाकडी खांब गाडत होता. यावेळी उर्मिला शिंगाडे यांनी माझ्या घराच्या बाथरुमजवळ बांबू का गाडतोस असे हटकले असता संगम नंदेश्वर हा तिथून निघून गेला. परंतु त्याचा मोठा भाऊ अचित नंदेश्वर याने सुनियोजितपणे तिथे जाऊन उर्मिला शिंगाडे यांच्याशी वाद करून तिला काठीने मारहाण केली. तसेच तोंडावर, डोक्यावर, कपाळावर, पाठीवर मारहाण केली. यात उर्मिला शिंगाडे या बेशुद्ध झाल्या. शिंगाडे यांची भाची पूनम गडपायले व शेजाऱ्यांनी उर्मिला यांना भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. गंभीर जखमा असल्यामुळे शिंगाडे यांना पुढील उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आले. भंडारा पोलीस ठाण्यात पूनम गडपायले हिने नंदेश्वर विरुद्ध तक्रार दाखल केली. तपासाअंती पोलिसांनी नंदेश्वर विरुद्ध भादंविच्या ३०७, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला. आरोपीविरुद्ध पुरावा आढळून आल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.जे. अकर्ते यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. याप्रकरणी वच्छला शिंगाडे, मंगला गडपायले, उर्मिला शिंगाडे, वैद्यकीय अधिकारी सुयोग कांबळे, शेखर गभणे, पोलीस हवालदार देवीदास बागडे, तपासीय अधिकारी संजय खंडारे यांची न्यायालयात साक्ष घेण्यात आली. साक्ष पुरावा, जखमीचे वैद्यकीय प्रमाणपत्र, क्युरी रिपोर्ट, वकीलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी अचित नंदेश्वर याला आरोपी ठरविण्यात आले. तसेच त्याला कलम ३२५ भादंविच्या गुन्ह्यांतर्गत पाच वर्षाचा सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड तसेच ५०४ कलमांतर्गत एक वर्षाचा कारावास व दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला. न्यायाधिशांनी आदेशात उर्मिला शिंगाडे यांना दंडाच्या रकमेतून दुखापत मोबदला म्हणून २५ हजार रुपये देण्याचे आदेशही दिले आहेत. याप्रकरणाची गावपरिसरात चर्चा आहे. आरोपीची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)