दोन अपघातांत पाचजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:37 IST2021-02-05T08:37:40+5:302021-02-05T08:37:40+5:30

नरेंद्र मुळे, नामदेव राहगडाले (रा. बपेरा), अश्विन राणे, महेश निकुळे (रा. सिहोरा), ऋषिकुमार कोहळे (रा. गोंडीटोला) अशी जखमींची ...

Five people were injured in two accidents | दोन अपघातांत पाचजण जखमी

दोन अपघातांत पाचजण जखमी

नरेंद्र मुळे, नामदेव राहगडाले (रा. बपेरा), अश्विन राणे, महेश निकुळे (रा. सिहोरा), ऋषिकुमार कोहळे (रा. गोंडीटोला) अशी जखमींची नावे आहेत. तुमसर-बपेरा राज्य मार्गावर नाकाडोंगरी राज्य मार्गावरील वाहतूक वळती करण्यात आली. त्यामुळे वाहनांच्या वर्दळीत वाढ झाली आहे. सोमवारी दुपारी २ च्यासुमारास अश्विन राणे, महेश निकुळे दुचाकीने सिहोराकडे येत असता एका वळणावर रनेरा गावाच्या शेजारी झाडावर आदळले. यात त्यांना दुखापत झाली आहे. दुपारी झालेल्या या अपघाताची शाई वाळत नाही तोच सायंकाळी ७ च्यासुमारास चुल्हाड बसस्थानकाशेजारी दोन दुचाकींची टक्कर झाली. यात नरेंद्र मुळे, नामदेव राहगडाले (रा. बपेरा) आणि ऋषिकुमार कोहळे (रा. गोंडीटोला) जखमी झाले. त्यांना तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Five people were injured in two accidents