बायोफ्लॉक तंत्राने मत्स्यपालनाचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:00 AM2020-08-03T05:00:00+5:302020-08-03T05:01:35+5:30

साकोली येथील निवृत्त मत्स्य अधिकारी मारुती चांदेवार यांनी गोंडउमरी येथील घरी बायोफ्लॉक तंत्रज्ञानाची छोटेखानी प्रयोगशाळा तयार केली आहे. त्यामध्ये २० हजार लिटर क्षमतेचे पाण्याची टाकी तयार केली. यासाठी आवश्यक प्रो बायोटेक नावाचे बॅक्टेरिया कार्बन सोर्स पाण्याचा टीडीएस व पीएच संतुलीत करून बॅक्टेरिया कल्चर केले जाते. यानंतर त्यात १० ग्रॅम वजनाचे एक हजार मत्स्य बीज सोडले जाते.

Fisheries experiment with bioflock technique | बायोफ्लॉक तंत्राने मत्स्यपालनाचा प्रयोग

बायोफ्लॉक तंत्राने मत्स्यपालनाचा प्रयोग

Next
ठळक मुद्देआठ महिन्यात एक लाखांचे उत्पादन : स्वयंरोजगारासाठी देणार प्रशिक्षण

संजय साठवणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : तालुक्यातील गोंडउमरी येथे सेवानिवृत्त मत्स्य व्यवसाय अधिकारी मारुती चांदेवार व मत्स्य व्यवसाय शाळा पालघर येथे शिक्षिका म्हणून काम केलेली त्यांची पत्नी संजीवनी चांदेवार यांनी वर्षभर प्रयत्न करून बायोफ्लॉक तंत्रज्ञानातून मत्स्यपालनाचा यशस्वी प्रयोग केला. यात कृत्रिम टाक्यात पाणी न बदलता व वेगळे खाद्य न टाकता मत्स्यपालन सहज शक्य होते. त्यामुळे घरी लहान जागेतही मत्स्यपालनाचा स्वयंरोजगाराची दारे उत्साही युवकांसाठी खुली झाली आहेत.
साकोली येथील निवृत्त मत्स्य अधिकारी मारुती चांदेवार यांनी गोंडउमरी येथील घरी बायोफ्लॉक तंत्रज्ञानाची छोटेखानी प्रयोगशाळा तयार केली आहे. त्यामध्ये २० हजार लिटर क्षमतेचे पाण्याची टाकी तयार केली. यासाठी आवश्यक प्रो बायोटेक नावाचे बॅक्टेरिया कार्बन सोर्स पाण्याचा टीडीएस व पीएच संतुलीत करून बॅक्टेरिया कल्चर केले जाते. यानंतर त्यात १० ग्रॅम वजनाचे एक हजार मत्स्य बीज सोडले जाते. या तंत्रज्ञानाचा शक्यतो पेगासस, शिफ्ट, तिलापिया, गावठी वागूर, सिंधी आदी प्रजातीचे पालन केले जाते. सतत पंपाद्वारे पाण्यामध्ये हवेद्वारे आॅक्सीजन वायू पाण्यात सोडला जातो. त्यामुळे बॅक्टेरिया झुंडी म्हणजे बायोफ्लॉक तयार होतात. सदर बॅक्टेरिया पाण्यातील माशांच्या विष्ठेपासून प्रोटोसेल म्हणजे खाद्य तयार करतात. त्यामुळे पाण्याचे शुद्धीकरण होते. त्यात अमोनिया वायू तयार होत नाही. माशांची विष्ठा जीवाणूंनी खाल्ल्यामुळे पाणी स्वच्छ राहते. त्यामुळे एकदा भरलेले पाणी मासे निघेपर्यंत बदलण्याची गरज भासत नाही. साधारणपणे आठ महिन्यात एक मासा सरासरी एक किलोप्रमाणे तयार होतो. खर्च वजा जाता एका टाक्यापासून ५० हजार रुपये प्राप्त होऊ शकते. या तंत्रज्ञानाने त्यांनी सध्या तीन टाके तयार केले असून दोन टाक्यात उत्पादन घेणे सुरु आहे. पुढील वर्षात बारा टाके तयार करण्याचा मानस आहे. ज्यांच्याकडे शेती व पाण्याची उपलब्धता नाही त्यांच्याकडे दोन ते तीन हजार फुट जागा असेल ते सुद्धा तंत्रज्ञान वापरून हा व्यवसाय कमी खर्चात करून आपला उदरनिर्वाह करू शकतात. आगामी नोव्हेंबर महिन्यापासून बायोफ्लॉक पद्धतीने मत्स्यपालन या विषयावर प्रत्यक्ष टँक प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देणार आहेत. त्यामुळे बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची त्यांची तयारी आहे. लवकरच त्यांच्याकडे अद्ययावत बायोफ्लॉक तंत्रज्ञान प्रयोगशाळा व व्यवसायीक सहा टँक तयार होत आहेत. त्यात झिंगा पालनावर सुद्धा संशोधन सुरु आहे.

पतीपत्नीच्या सहयोगाने प्रकल्प
आंध्रप्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यात अशा प्रकारे मत्स्य उत्पादन घेतले जाते. त्यातून अनेकांनी रोजगार उभा केला आहे. अशा ठिकाणी भेट देऊन तेथील अभ्यास केला. त्यातून या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकल्प उभारताना फायदा झाला आहे.


कमी जागेत अधिक उत्पादन
साधारणपणे एक हजार किलो मासे उत्पादनासाठी आधुनिक तंत्र वापरून एक एकर बाय पाच फुट खोलीचा तलाव लागतो. त्यात वारंवार पाणी भरून पाण्याची पातळी कायम ठेवावी लागते. परंतु या तंत्रज्ञानाद्वारे केवळ तीन बाय सात म्हणजे २० हजार लिटर पाण्याची टाकी तयार करून बायोफ्लोक पद्धतीने एक टन मासे उत्पादन करता येऊ शकते.

Web Title: Fisheries experiment with bioflock technique

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.