शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती परीक्षा स्पर्धेची प्रथम पायरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:40 IST

शेखर साखरवाडे: मार्गदर्शिकेचे वाटप फोटो - विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शेखर साखरवाडे, रामा लांजेवार, गजानन वैद्य. मोहाडी - ...

शेखर साखरवाडे: मार्गदर्शिकेचे वाटप

फोटो - विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शेखर साखरवाडे, रामा लांजेवार, गजानन वैद्य.

मोहाडी - शालेय पातळीवर विविध परीक्षा घेतल्या जातात. शिष्यवृत्ती परीक्षा स्पर्धा परीक्षेची प्रथम पायरी आहे. अभ्यासाचे नियोजन असले पाहिजे. ठरवून केलेला अभ्यास जिद्दीने केला तर हवं ते मिळविता येईल, असे प्रतिपादन उद्योजक शेखर साखरवाडे यांनी केले.

महात्मा जोतिबा फुले हायस्कूल मोहगाव देवी येथील शाळेत शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शिकेचे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नववीची विद्यार्थिनी सानिका लेंडे होती. उद्योजक रामाभाऊ लांजेवार, मुख्याध्यापक राजकुमार बांते, सहायक शिक्षक हंसराज भडके, गजानन वैद्य, शोभा कोचे, गोपाल मडामे, मोहन वाघमारे, श्रीहरी पडोळे यांची उपस्थिती होती. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी व हुतात्मा दिनाचे औचित्य साधून आठवीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या ३९ मुलांना मार्गदर्शिका पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. उपविभागीय अधिकारी कार्यालय मौदा येथील नायब तहसीलदार नवनाथ कातकडे यांनी मार्गदर्शिका पुस्तिका उपलब्ध करून दिल्या. याप्रसंगी रामाभाऊ लांजेवार म्हणाले, ‘मुलांनी आलेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे. आपले व शाळेचे नाव कमवायचे असेल तर खूप अभ्यास करा.’ यावेळी सानिका लेंडे हिने साबरमती के संत.. हा गीत प्रस्तुत केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक राजकुमार बांते यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. संचालन सहायक शिक्षक हेमराज राऊत यांनी तर आभार हंसराज भडके यांनी मानले.

*बॉक्स*

शिष्यवृत्तीस पात्र व्हा..हजार रुपये मिळवा*

महात्मा जोतिबा फुले शाळेतून शिष्यवृत्तीस पात्र ठरणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना बक्षीस उद्योजक शेखर साखरवाडे यांच्याकडून एक हजार रुपये मिळणार आहेत.