चुल्हाड येथे वीजेच्या खांबाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 05:00 AM2020-05-26T05:00:00+5:302020-05-26T05:01:28+5:30

शनिवारी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान सिहोरा येथील अत्यंत दाट लोकवस्तीच्या भागात माध्यमिक शाळेच्या शेजारी असणाऱ्या विजेच्या खांबाला आग लागली. त्यामुळे गावकरी भयभीत झाले. विजेच्या खांबावर असणारे पक्षाचे घरटे जागीच जळुन खाक झाले. घरटे जळत असताना आगीचे लोळ खाली कोसळत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली.

Fire at electricity pole at Chulhad | चुल्हाड येथे वीजेच्या खांबाला आग

चुल्हाड येथे वीजेच्या खांबाला आग

Next
ठळक मुद्देसुदैवाने अपघात टळला : वीज प्रवाह तात्काळ केला खंडित

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : येथील गावात विद्युत प्रवाह सुरु असताना अचानक विजेच्या खांबाला आग लागली. दुपारच्या वेळी आग लागल्याची घटना घडल्याने गावात एकच खळबळ उडाली.
शनिवारी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान सिहोरा येथील अत्यंत दाट लोकवस्तीच्या भागात माध्यमिक शाळेच्या शेजारी असणाऱ्या विजेच्या खांबाला आग लागली. त्यामुळे गावकरी भयभीत झाले. विजेच्या खांबावर असणारे पक्षाचे घरटे जागीच जळुन खाक झाले. घरटे जळत असताना आगीचे लोळ खाली कोसळत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली. दुपारच्या दरम्यान आग लागल्याने नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. आग विझविण्यासाठी आरडा सुरु झाल्यानंतर वीज वितरण कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली. गावातच वीज वितरणचे कर्मचारी कार्यरत असल्याने लाईनमेन तात्काळ दाखल झाले. कर्मचारी आल्याने तात्काळ आल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला. तात्काळ विजेचाप्रवाह बंद केल्याने आग ओटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे घरांच्या नुकसानीसह जीवित हानी टळली. पावसाळ्यापुर्वीची कामे वीज वितरण कडून सुरु असून अनेक ठिकाणी वाकलेले पोल दुरुस्ती, लोंबकळणाºया तारा व अन्य किरकोळ कामे सुरु आहेत.

Web Title: Fire at electricity pole at Chulhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज