दिघोरी ग्रामपंचायत कार्यालयाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:55 AM2019-06-23T00:55:04+5:302019-06-23T00:55:26+5:30

येथील ग्रामपंचायत कार्यालयात सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास धूर निघत असल्याचे ग्रामपंचायत परिसरात असणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आले. ग्रामस्थांनी लगेच सरपंच अरुण गभणे यांना भ्रमणध्वनीद्वारे सदर घटनेची माहिती दिली.

Fire to Digori Gram Panchayat office | दिघोरी ग्रामपंचायत कार्यालयाला आग

दिघोरी ग्रामपंचायत कार्यालयाला आग

Next
ठळक मुद्देदस्तऐवजांचे नुकसान। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्क
दिघोरी/मोठी : येथील ग्रामपंचायत कार्यालयात सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास धूर निघत असल्याचे ग्रामपंचायत परिसरात असणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आले. ग्रामस्थांनी लगेच सरपंच अरुण गभणे यांना भ्रमणध्वनीद्वारे सदर घटनेची माहिती दिली. सरपंच गभने यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना याची माहिती देत तत्काळ ग्रामपंचायत गाठली व आग विझविण्यात आली.
सायंकाळी ग्रामपंचायत बंद करुन सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य गावठाण फिडरला थ्रीफेज विद्युत पुरवठ्याच्या पाहणीसाठी विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत पाणी पुरवठ्याच्या विहिरीवर गेले होते. ज्या वेळेस ग्रामपंचायतीला आग लागल्याचे भ्रमणध्वनीद्वारे माहिती मिळाली. सरपंचासहीत सदस्य व विद्युत विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले.
ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी विहिर, बोअरवेल व सार्वजनिक नळाच्या पाण्याच्या सॅम्पलच्या बॉटल्या होत्या. तसेच थंडपाण्याच्या फ्रिजरचा कनेक्शन याच खोलीतून सुरु होता. जुना दस्ताऐवज व बंद पडलेले कॅम्प्युटरचे सामान या खोलीत होते. तसेच जळालेल्या साहित्यांमध्ये दारुच्या बाटल्या आढळून आल्या.
सदर घटनेमध्ये कॅम्प्युटर व काही कागदपत्रे नुकसान झाल्याचे आढळून आले. विद्युत विभागाचे कर्मचारी यांनी सदर आग शार्ट सर्कीटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज दर्शविला. सदर घटनेची माहिती दिघोरी पोलीस ठाण्यात देण्यात आली असून वृत्त लिहीपर्यंत पोलीस ठाण्याची कार्यवाही सुरु होती.
याबाबत सरपंच अरुण गभणे यांचेशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शार्टसर्कीटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. विद्युत कर्मचाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. सदर प्रकरणाची तक्रार दिघोरी पोलीस ठाण्यात देण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Web Title: Fire to Digori Gram Panchayat office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.