हरविलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 06:00 AM2020-01-18T06:00:00+5:302020-01-18T06:00:23+5:30

मोबाईल हरविणे किंवा चोरीस जाणे ही दैनंदिन बाब झाली आहे. अनेकांचे महागडे मोबाईल चोरीस जातात किंवा कुठेतरी हरविले जातात. परंतु एकदा हरविलेला मोबाईल परत मिळत नसल्याने अनेक जण तक्रारही करीत नाही. मात्र हरविलेला मोबाईलही सापडू शकतो, हे भंडारा सायबर पोलीस ठाण्याने सिद्ध केले आहे. जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यात दाखल मोबाईल हरविल्याच्या तक्रारींचा या ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला.

Find the lost mobile and return it to the original owner | हरविलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना परत

हरविलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना परत

Next
ठळक मुद्देसायबर पोलिसांची कामगिरी : आयएमईआय क्रमांकावरून शोधले ५० मोबाईल

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : एकदा मोबाईल हरविला किंवा चोरीस गेला तर तो परत मिळण्याची आशाच नसते. स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिनस्त सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एक दोन नव्हे तब्बल ५० मोबाईलचा शोध घेवून मूळ मालकास परत केले. हरविलेला आपला मोबाईल परत मिळत असल्याचे पाहून प्रत्येकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
मोबाईल हरविणे किंवा चोरीस जाणे ही दैनंदिन बाब झाली आहे. अनेकांचे महागडे मोबाईल चोरीस जातात किंवा कुठेतरी हरविले जातात. परंतु एकदा हरविलेला मोबाईल परत मिळत नसल्याने अनेक जण तक्रारही करीत नाही. मात्र हरविलेला मोबाईलही सापडू शकतो, हे भंडारा सायबर पोलीस ठाण्याने सिद्ध केले आहे. जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यात दाखल मोबाईल हरविल्याच्या तक्रारींचा या ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला. आयएमईआय क्रमांकाला ट्रेसिंग करून मोबाईल शोधण्यात आले.
एक दोन नव्हे तब्बल ५० मोबाईल सायबर पोलिसांनी शोधून काढले. त्यानंतर त्या मोबाईलच्या मूळ मालकांचा शोध घेण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या उपस्थितीत एका छोटेखानी समारंभात मूळ मालकाला त्यांचा मोबाईल परत करण्यात आला. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर, सायबर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भूषण पवार, दिनेंद्र आंबेडारे, गौतम राऊत, स्रेहल गजभिये, राजेंद्र कापगते, सुमेध रामटेके, निलेश फाये, निखिल रोडगे, उमेश्वरी नाहोकर आदी उपस्थित होते.

हरविलेल्या मोबाईलची तक्रार आवश्यक
मोबाईल चोरीस गेल्यास किंवा हरविल्यास त्याची तक्रार करणे आवश्यक आहे. अन्यथा या मोबाईलचा गैरवापर होवू शकतो. तक्रार नसल्यास मूळ मालकावरच गुन्हे दाखल होवू शकतात. मोबाईल हरविल्यास सर्वप्रथम पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, असे एलसीबीचे रवींद्र मानकर सांगितले.

Web Title: Find the lost mobile and return it to the original owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.