शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

अखेर बावनथडी प्रकल्पाचे पाणी जलाशयात सोडले

By admin | Updated: April 28, 2017 00:33 IST

बावनथडीचे पाणी बघेडा व कारली जलाशयात सोडण्यासाठी आ.चरण वाघमारे यांनी मध्यस्थी केल्यानंतर ....

शेतकऱ्यांमध्ये आनंद: चरण वाघमारे यांची मध्यस्थी, शिवसेनेनेही केले होते पाण्यासाठी आंदोलन पवनारा : बावनथडीचे पाणी बघेडा व कारली जलाशयात सोडण्यासाठी आ.चरण वाघमारे यांनी मध्यस्थी केल्यानंतर २७ एप्रिलला सकाळी ९.३० वाजता बावणथडीचे पाणी बघेडा व कारली जलाशयात सोडण्यात आले आहे. तुमसर तालुक्यातील बघेडा व कारली जलाशयात पाण्याचा तुटवडा पडल्यामुळे जलाशयांतर्गत १५०० एकरातील धान पीक करपण्याच्या मार्गावर होते. यासंदर्भात बावनथडीचे पाणी बघेडा व कारली जलाशयात सोडण्याविषयी डॉ.हरेंद्र रहांगडाले यांच्या नेतृत्वात संदीप टाले, मुन्ना पुंडे, सदन चौधरी, रतन पारधी, दीनदयाल बिसने, अशोक ठाकूर, गोपीचंद गायकवाड अन्य शेतकरी सहभागी होऊन बुधवारला धरणे आंदोलन केले. संबंधित विभागाचे अधिकारी राठोड यांनी आंदोलनकर्त्याला बावनथडीचे पाणी सोडण्यात येईल, असे लेखी पत्र दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु रात्रीपर्यंत पाणी सोडण्यात आले नव्हते. आ.चरण वाघमारे यांनी डॉ.हरेंद्र रहांगडाले यांच्या शेतकऱ्यांच्या हिताचा नेतृत्वाला गंभीरतेने घेऊन मध्यस्थी केली. त्यांनतर ताबडतोब सबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून बावनथडीच्या पाण्याची समस्या दूर केली. गुरूवारला सकाळी ९.३० वाजता बावणथडीचे पाणी बघेडा व कारली जलाशयात सोडण्यात आले. आ. वाघमारे यांनी धरणावर जाऊन आपल्या समक्ष पाणी सोडून घेतले. यावेळी जिल्हा परीषद सदस्य संदीप टाले, पंचायत समिती सदस्य मुन्ना पुंडे, गुरुदेव भोंडे, तहसीलदार गजेंद्र बालपांडे, नायब तहसीलदार निलेश गौड, उपविभागीय अभियंता बावणथडी राठोड, ठाणेदार गोबरवाही किशोर झोटिंग, सरपंच बघेडा वसंत तरटे, प्रकाश दुर्गे, नामदेव चौधरी, अशोक उईके, अशोक ठाकूर, दीनदयाल बिसने, राजेंद्र रहांगडाले, गोपीचंद गायकवाड, यशपाल गौपाले, हेमंत चंद्रिकापुरे, रामदास नगरे, निखिल पटले, दुर्गेश हाडगे, नरेश पेंदाम, फुलचंद गौपाले, रमेश बिसने, मनोज ठाकरे उपस्थित होते. दरम्यान बावनथडीचे पाणी सिंचनासाठी शेतकऱ्यांना देण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांच्या नेतृत्त्वात २१ एप्रिल रोजी तुमसरात अधिकाऱ्यांना घेराव करण्यात आले होते. बुधवारला याच मागणीसाठी चिचोली फाट्यावर तीन तास रास्ता रोको आंदोलन केले होते. यावेळी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, भंडारा शहर प्रमुख सुर्यकांत ईलमे उपस्थित होते. (वार्ताहर)