अखेर सुरक्षा रक्षकांना मिळाले सहा महिन्यांचे वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 05:00 AM2020-08-14T05:00:00+5:302020-08-14T05:01:08+5:30

एजन्सीने सुरक्षा रक्षकांचा पैसा दिला नाही तरी मानस कंपनीच्या वतीने मध्यस्थी करून सुरक्षा रक्षकांचा पगार देणार असल्याचे कंपनीचे व्यवस्थापक विजय राऊत यांनी सांगितले. सुरक्षा एजेन्सीचे मालक नदीम खान यांना तत्काळ पगार देण्यास सांगितले व पगार देण्यात आले. शिवसेना प्रमुख अनिल सार्वे यांचे कडून आंदोलन मागे घेण्यात आले.

Finally, the security guards received six months' salary | अखेर सुरक्षा रक्षकांना मिळाले सहा महिन्यांचे वेतन

अखेर सुरक्षा रक्षकांना मिळाले सहा महिन्यांचे वेतन

Next
ठळक मुद्देकारखाना व्यवस्थापनाची शिष्टाई : शिवसेनेच्या आंदोलनाचे यश, सुरक्षा रक्षकांना मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : भंडारा जिल्ह्यातील देव्हाडा येथे मानस साखर कारखाना असून या ठिकाणी सुरक्षा रक्षक यांचे गत सहा महिन्यापासून पगार झाले नाही. आधीच कोरोनाच्या संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांपुढे जगण्याचे मोठे आव्हान असताना कामाचा दाम मिळत नसल्याने ११ ऑगस्ट रोजी मानस साखर कारखाना देव्हाडा येथे शिवसेना मोहाडी तालुका शिवसेना प्रमुख अनिल सार्वे यांच्या नेतृत्वाखाली व सुरक्षा रक्षक यांच्या उपस्थितीत कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते.
अखेर मानस साखर कारखान्याचे व्यवस्थापक विजय राऊत यांच्या मध्यस्थीने तोडगा काढून पगार देण्यास येईल, असे सांगून मध्यस्थी करण्यात आली व संबंधित एजंसीच्या वतीने पगार वाटप करण्यात आले.
कंपनीने जर पगार दिला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. तर सुरक्षा रक्षक हे कंपनीचे नसून एजन्सीचे आहेत.
एजन्सीने सुरक्षा रक्षकांचा पैसा दिला नाही तरी मानस कंपनीच्या वतीने मध्यस्थी करून सुरक्षा रक्षकांचा पगार देणार असल्याचे कंपनीचे व्यवस्थापक विजय राऊत यांनी सांगितले. सुरक्षा एजेन्सीचे मालक नदीम खान यांना तत्काळ पगार देण्यास सांगितले व पगार देण्यात आले. शिवसेना प्रमुख अनिल सार्वे यांचे कडून आंदोलन मागे घेण्यात आले.

सुरक्षा रक्षकाकडून साखर कारखान्यावर बिनबुडाचे आरोप करीत होते ते खोटे आहे. कारण सुरक्षा रक्षकाची भरती एजेन्सीकडून केले जाते. त्यांना कारखानाकडून बंद केले जात नाही. त्याची जबाबदारी एजेन्सीवर असते. परंतु सुरक्षा रक्षक आम्हाला धारेवर धरतात. सुरक्षा रक्षकांचे आरोप बिनबुडाचे आहेत.
-विजय राऊत, व्यवस्थापक, मानस साखर कारखाना, देव्हाडा.

व्यवस्थापनाकडून तोडगा
भंडारा जिल्ह्यात एकमात्र साखर कारखाना मोहाडी तालुक्यातील देव्हाडा येथे असून या ठिकाणी ४० सुरक्षा रक्षक कामावर आहेत. गत सहा महिन्यांपासून १२ सुरक्षा रक्षकांना त्यांच्या कामाचा पैसा मिळाला नव्हता. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने कंपनीच्या प्रवेशद्वारा समोर आंदोलन करण्यात आले. याची दखल घेऊन व्यवस्थापनाने तोडगा काढला.

Web Title: Finally, the security guards received six months' salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.