शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

खताचा काळाबाजार खपवून घेणार नाही

By admin | Updated: September 20, 2014 23:44 IST

मागीलवर्षी अतिवृष्टीने धानपिकाचे हातातून गेले. यावर्षी अत्यल्प पावसामुळे कुठे दुबार तर कुठे तिबार पेरणीची शेतकऱ्यांवर वेळ आली. त्यातच खताचा काळाबाजार सुरु झाल्यामुळे शेतकरी

शेतकरी हवालदिल : आ.नरेंद्र भोंडेकर गरजलेभंडारा : मागीलवर्षी अतिवृष्टीने धानपिकाचे हातातून गेले. यावर्षी अत्यल्प पावसामुळे कुठे दुबार तर कुठे तिबार पेरणीची शेतकऱ्यांवर वेळ आली. त्यातच खताचा काळाबाजार सुरु झाल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. शेतकऱ्यांवर अस्मानीसह सुलतानी संकट ओढवले असल्यामुळे शेतकऱ्यांना विनात्रास आवश्यक तितके खत देण्यात यावी, असे सांगून खताचा काळाबाजार खपवून घेणार नाही, असा ईशारा आमदार आ.नरेंद्र भोंडेकर यांनी दिला.यावेळी ते म्हणाले, जिल्ह्यात रॅकपार्इंट व्हावे, ही मागणी सभागृहात सातत्याने लावून धरली. तत्कालीन केंद्रातील संपुआ सरकारने भंडाऱ्यात रॅकपार्इंट करण्यासाठी चारवेळा पाहणी करुन गेले. परंतु, रॅकपार्इंट मात्र झाले नाही. शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या खताचा काळाबाजार हा मुख्यत्वे करुन त्या-त्या खासगी कंपनीकडून सुरू आहेत. त्यात त्या कंपनीचे अधिकारी सहभागी असल्याचा आरोप आ.भोंडेकर यांनी केला आहे.भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा आहे. या जिल्ह्यातील शेतकरी मुख्यत्वेकरुन धानाची शेती करतात. यावर्षी भंडारा जिल्ह्यात १.८२ लाख हेक्टर क्षेत्रात धानपिकांची लागवड केली आहे. परंतु यावर्षी मृगाचा पाऊस पडला नाही, त्यानंतर जून महिना कोरडा गेला. जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली तोपर्यंत पऱ्हे करपले. काहींनी पाणी देऊन पऱ्हे वाचविले. त्यानंतर पाऊस बरसला, शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. पऱ्हे मोठे झाले असताना शेतकऱ्यांना खते मिळण्यासाठी अडचणी येऊ लागल्या. परिणामी शेतकरी त्रस्त झाला आहे.एकीकडे खताचा मुबलक पुरवठा आहे, असे सांगणारे जिल्हा प्रशासनाचे या काळाबाजारीकडे लक्ष गेलेले नाही. जिल्हा प्रशासन करते तरी काय? असा सवाल करुन शेतकऱ्यांची समस्या सोडवावी, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.कोट्यवधीचे कामे खेचून आणलीपवनी शहरात बसस्थानक ते नगरपरीषद शाळा या मार्गासाठी सात कोटींचा निधी मिळवून दिला असून कामे प्रगतीपथावर आहेत. अड्याळ, कोंढा, आसगाव, पहेला, भंडारा शहरातील राजीव गांधी चौक ते नागपूर नाका आणि शास्त्री चौक ते आयटीआयपर्यंतचे चौपदरीकरण होणार आहे. ही कामे होताच शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. अड्याळ येथे ३० खाटांचे रुग्णालय ५० खाटांचे केले. भंडाऱ्यात १०० खाटांचे महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय मंजूर झाले आहे. क्रिडा संकुलाच्या विकासासाठी सात कोटी मंजूर केले आहे. पांडे महालाचे वास्तु संग्रहालय आणि सांस्कृतिक भवनाचे काम प्रस्तावित असल्याचे आ.भोंडेकर यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)