शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील बाजारपेठांवर पितृपक्षाची छाया

By admin | Updated: September 14, 2014 23:54 IST

गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठेत आलेली तेजी आणि पुढच्या काळात निवडणुका असल्याने ती कायम राहण्याची आलेली संधी मधल्या काळातच आलेल्या पितृपक्षामुळे काही अंशी का असे ना ओसरली आहे.

भंडारा : गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठेत आलेली तेजी आणि पुढच्या काळात निवडणुका असल्याने ती कायम राहण्याची आलेली संधी मधल्या काळातच आलेल्या पितृपक्षामुळे काही अंशी का असे ना ओसरली आहे. सर्वच बाजारपेठांमध्ये सध्याच्या काळात मंदीचे चित्र आहे. जग झपाट्याने बदलत असताना आणि त्यावर आधुनिक तंत्रज्ञानाचा पगडा असताना जुन्या चालीरीतीवर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या सध्या तरी कमी झालेली नाही. त्यामुळेच पितृपक्षाचा परिणाम बाजारपेठांमधील उलाढालीवर दिसून येत असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. पितृपक्षाचा हा काळ वर्षानुवर्षे बाजाराला निषिद्ध का आहे, हे उमगत नसले तरी या काळात व्यवहार बंदच असतात. या पक्षात कोणताही मोठा व्यवहार होत नाही. जमीन, सोन्याची खरेदी-विक्री किंवा इतरही अनेक बाबी या काळात शुभ मानल्या जात नाहीत. फुलांच्या बाजारावर परिणामपितृपक्षाच्या अखेरीस फुलांचा बाजार मंदीतच असून नवरात्र सुरू होईपर्यंत हे भाव असेच राहणार आहेत. पितृपक्षात फुले कोमजलेलीच आहे. गणेशोत्सवात जितकी कमाई झाली त्याच्या काही पटीने या पंधरा दिवसांत तोटा झाला आहे. पितृपक्षात सर्वच व्यवहार बंद ठेवण्याचा प्रघात आहे. त्यामुळे फुलांचे नुकसान होत असून अगदीच मातीमोल भावाने फुले विकावी लागत आहेत . गणेशोत्सवात जी फुले ३०० रुपयांपर्यंत जाऊन ठेपली होती ती आज ८० रुपयांपर्यंत घसरली आहेत. तसे पाहता पितृपक्षात फुलांचा बाजार का मंदावतो हे गणित उलगडत नसल्याचे फूलविक्रेत्यांनी सांगितले. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीला ब्रेकगणेशोत्सवाच्या आनंदोत्सवासोबतच खरेदीचा आनंद पितृपक्षामुळे ओसरल्याचे चित्र शहरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या शोरूम्समध्ये दिसत आहे. या क्षेत्रातील खरेदी तब्बल ६० ते ७० टक्क्यांनी घटल्याचे व्यावसायिकांचे मत आहे. अशा वातावरणामुळे ग्राहकांसह व्यावसायिकांचेही डोळे नवरात्रोत्सवाकडे लागले आहेत. एलईडी, एलसीडी, फ्रीज, वॉशिंग मशीन्स, डीव्हीडी प्लेयसर्पासून ते डीटीएच विक्रेत्यांपर्यंत साऱ्यांनाच मंदीचा फटका बसतो आहे. सध्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने व शोरूम्समध्ये ग्राहकांची वर्दळ दिसत असली तरीही, प्रत्यक्षात ती केवळ 'वॉकिंग' अर्थात एखादे प्रॉडक्ट पाहून ते निश्चित करून जाणे हाच हेतू असतो. दसऱ्यापर्यंत मंदी कायम राहणार असल्याने व्यावसायिक 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहेत. दसरा ते दिवाळीदरम्यान मुहूर्त कॅश करण्याची व्यावसायिकांनी तयारी सुरू केली आहे.बांधकामे जोरातबिल्डर्सनी दिलेल्या आश्वासनानुसार बांधकामे पूर्ण करण्याकडे कल असल्याने शहरातील सर्वच ठिकाणी बांधकाम जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीत घरांचा ताबा देण्यासाठी अनेक बिल्डर्संनी बांधकामाला वेग दिला आहे. शहरात रिअल इस्टेट क्षेत्र जोरात असल्याने शहराच्या विविध भागात अनेक बांधकाम प्रकल्पांचे काम वेगात आहे. कापड बाजार 'फिफ्टी-फिफ्टी'पितृपक्षात फटका बसणारा मोठा घटक म्हणून कापड व्यवसाय ओळखला जातो. जुन्या रूढी आणि परंपरेनुसार पितृपक्षात नवीन कपडे खरेदी केले जात नाहीत. त्यामुळेच पंधरवड्यात कापड व्यवसायावर बऱ्यापैकी परिणाम होतो. यंदा मात्र परिस्थिती काहीशी वेगळी आहे. पितृपक्षातील फटका लक्षात घेत रेडिमेड व्यावसायिक विविध स्कीम्सद्वारे ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. शहरातील शॉपिंग मॉलमधील स्कीम्समुळे कपड्यांची बऱ्यापैकी उलाढाल होत आहे. पितृपक्षानंतर येणारी लग्नसराईदेखील कारणीभूत मानली जाते. अनेकांनी पितृपक्षानंतर दरवाढ होण्याचा धसका घेत त्यापूर्वीच लग्नाची खरेदी केली आहे. दुकानदारही जुना स्टॉक क्लिअरन्सवर भर देतात. त्यामुळे बाजारात नवीन व्हेरायटी दिसून आल्या नाहीत. साधारण नवरात्रीच्या तीन ते चार दिवस आधी नवीन माल मागवला जातो. यात नवरात्री व दसऱ्याची खरेदी डोळ्यासमोर ठेवून माल भरला जातो. (नगर प्रतिनिधी)