शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

बंधारा फोडल्याने शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2017 00:20 IST

तालुक्यातील जेवणाळा मचारना नजीकच्या ईसापूर सरकारी नाल्यावर बंधारा फोडण्यात आल्याने सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शासकीय मालमत्तेचे नुकसान : पालांदूर पोलिसांची टाळाटाळलोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यातील जेवणाळा मचारना नजीकच्या ईसापूर सरकारी नाल्यावर बंधारा फोडण्यात आल्याने सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील पाण्यावर अवलंबून असणारे शेतकरी संकटात सापडले आहे. जनावरांकरिता पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली आहे.तालुक्यातील जेवणाळा मचारना येथील ह.प.न ४ ईसापूर सरकारी नाल्यावर १९८२ ला बांधण्यात आला होता. त्यामुळे येथील पाण्याचा उपयोग शेतीसाठी तसेच गायी, गुरे, जनावरांसाठी पिण्याकरिता होत होता. ग्रामपंचायतद्वारे या बंधाऱ्याचा लिलाव मच्छीपालन करण्यासाठी येत होता. येथील पाण्यावर मचारना, केसलवाडा, ईसापूर येथील जवळजवळ १०० शेतकरी धान्य शेताकरिता अवलंबून आहेत. तसेच शासनाद्वारे या बंधाऱ्याच्या रपट्यावर लोखंडी गेट (दरवाजा पाटी) ३० लाख रुपये खर्चून उभारण्यात आली होती. परंतु २८ मार्च २०१७ ला रात्री ११ वाजता वसंता डोमा ठवकर रा.मचारना यांनी रात्री जेसीबी लावून बंधारा तोडण्याचा प्रयत्न केला. यावर शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यानंतर १६ मे २०१७ रोजी बंधाऱ्याचे लोखंडी दरवाज्याचे पोल कापले. बंधारा फोडून त्या जागेवर त्याने बांध्या तयार केल्या आहेत. हे काम त्याने रात्रीच्या वेळी केले. बंधारा तोडला गेल्यामुळे येथील पाण्यावर अवलंबून असणारे शेतकरी संकटात सापडले आहे. जनावरांकरिता पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली आहे. येथील आसपासची शेती ही पूर्णत: या बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे शेती करणे येथील शेतकऱ्यांना अडचणीत झाले आहे. त्यामुळे १०० शेतकऱ्याच्या दोनशे एकर शेतीला पावसाच्या पुरापासून होणारा धोका निर्माण होऊ शकतो, असे वर्तविले जात आहे. यावर ग्रामपंचायत मचारणा यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यावर शासकीय मालमतेचे नुकसान केल्याबाबद गुन्हा दाखल करून न्याय देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदनातून केली. निवेदनावर रविंद्र श्रीराम फंदे, दशरथ विठोबा कुथे, केवळराम काशीराम पर्वतकर, मीरा चित्ररंजन लांजेवार, श्यामराव सोमा झलके, सायात्रा सोमा कींनाळे, सरीता प्रकाश ढोके, तनिराम आसाराम घोनमोडे, श्रीराम तुळसीराम घोनमोडे, बाळा तुळशीराम घोनमोडे, नामदेव राजीराम लांजेवार, श्रावण मोतीराम कडव, तुलाराम बांते, नरेश ताराचंद फटे, अनमोल ईश्वर ढोके, संघराज धनराज गोस्वामी यांच्या स्वाक्षऱ्यांचा समावेश आहे.