शेतकऱ्यांनी कृषी तंत्रज्ञानाची कास धरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 05:00 AM2020-07-09T05:00:00+5:302020-07-09T05:01:07+5:30

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषीदिन साजरा करण्यात येत असून १ जुलै ते ७ जुलै पर्यंत कृषी संजीवनी सप्ताहचे आयोजन तुमसर तालुक्यातील ११६ गावांतील बांध्यावर प्रत्यक्ष कृषी विभाग जाऊन कार्यक्रम घेण्यात आले. या तालुकास्तरीय कृषी सजिवनी सप्ताहाचे समारोपीय कार्यक्रम आंबागड येथील शेतकरी उत्पादक कंपनी व भूमिपुत्र शेतकरी स्वयंसहायता गट आंबागड यांचे संयुक्त विद्यमाने पार पडला.

Farmers should have access to agricultural technology | शेतकऱ्यांनी कृषी तंत्रज्ञानाची कास धरावी

शेतकऱ्यांनी कृषी तंत्रज्ञानाची कास धरावी

Next
ठळक मुद्देविकास काळे : आंबागड येथे कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनारा : आजही बहुतांश शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती राबत असल्याने उत्पादन कमी व खर्चात वाढ होत असल्याने शेती व्यवसाय तोट्यात चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो, आता तंत्रज्ञानाचे युग असून शेतीमध्ये ही नवनवीन कृषी तत्रंज्ञानाचा वापर करून शेती फायद्याची होत आहे. शेतकऱ्यांनी सल्ल्याने शेतीमध्ये कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून आर्थिक उन्नती साधण्याचे आवाहन तुमसरचे तालुका कृषी अधिकारी विकास काळे यांनी केले. कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषीदिन साजरा करण्यात येत असून १ जुलै ते ७ जुलै पर्यंत कृषी संजीवनी सप्ताहचे आयोजन तुमसर तालुक्यातील ११६ गावांतील बांध्यावर प्रत्यक्ष कृषी विभाग जाऊन कार्यक्रम घेण्यात आले.
या तालुकास्तरीय कृषी सजिवनी सप्ताहाचे समारोपीय कार्यक्रम आंबागड येथील शेतकरी उत्पादक कंपनी व भूमिपुत्र शेतकरी स्वयंसहायता गट आंबागड यांचे संयुक्त विद्यमाने पार पडला.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी शामराव उईके, शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष प्रमोद कटरे, व्यवस्थापकीय संचालक अजय कावळे, भूमिपुत्र शेतकरी स्वयंसहायता गटाचे अध्यक्ष सजंय कावळे, कृषी अधिकारी सतिश कचरे, कृषी पर्यवेक्षक दिनेश काटेखाये, नखाते, कृषी सहायक निलेश उईके, आत्मा व्यवस्थापक विशाल पारीसे, कंपनीचे संचालक गिरधारी दमाहे, त्रिभुवणकार पटले, विलास बावणकर, सुधीर ठाकरे, मुकेश भोयर, मेघराज पटले, नरेश ठाकरे, सुशिला पटले, शुभम रहांगडाले व शेतकरी उपस्थित होते.
पीक विमा व गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना व एकात्मिक पंतप्रधान सूक्ष्म मिश्रण व भात पीक व्यवस्थापन यावर शामराव ऊईके यांनी मार्गदर्शन केले. प्रमोद कटरे यांनी सहकारातून समृद्धी व प्रकल्पाची व गटाचे बायो प्रोम, टोमॅटो केचप उद्योगाची माहिती दिली. यानंतर प्रगतशील शेतकरी अजय कावळे यांच्या शेतावर यांत्रिक पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक करण्यात आले. गटाचे तज्ञ संचालक संजय कावळे यांनी बायोप्रोम व सेंद्रीय शेती विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. संचालन जय मोरे यांनी तर आभार अजय कावळे यांनी आभार मानले.

Web Title: Farmers should have access to agricultural technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.