शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

हळद लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल

By admin | Updated: February 24, 2016 00:38 IST

तालुक्यातील काही गावे चौरास भागात मोडत असल्याने येथे विविध प्रकारची पिके घेतली जातात.

आसगाव (चौ.): तालुक्यातील काही गावे चौरास भागात मोडत असल्याने येथे विविध प्रकारची पिके घेतली जातात. येथे ऊस पिकासोबत भाजीपालावर्गीय पिकासोबत हळदपिकाचे सुध्दा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यातच बहुतेक उत्पादनापेक्षा हळदीचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे. पवनी तालुक्यामध्ये सुमारे ४०० एकरामध्ये संध्या हळदीचे उत्पादन घेतले जात आहे. तालुक्यातील भेंडाळा, खैरी, जुनोना, वडेगाव, मोखारा, सिंदपुरी आदी गावांमधील शेतकरी हळद उत्पादन घेतात. हळदीची लागवड साधारणत: जुलै महिन्यामध्ये केली जात असून सध्या काळणीचा हंगाम सुरु आहे. याची लागवड वाफे पध्दतीने केली जात असून वायगाव वाणाची लागवड अधिक असून सेलम व कृष्णा प्रजातीच्या वाणाची लागवड अल्प प्रमाणात असते. लागवडीची पध्दत साधारण असून ४ बाय १० च्या १ फुट उंच गादीवाफयावर लागवड करावी लागते. हळदीची काढणी झाल्यानंतर त्याला वाळत घालावी लागते. त्यानंतर ड्रममध्ये घालून त्यांना उकळावो लागते. उकळून झाल्यानंतर तीला सूर्यप्रकाशात वाळत घालावी लागते. वाळल्यानंतर ढोल्याच्या सहाय्याने घुसळावे लागते. हळद विक्रीसाठी उपलब्ध करण्यासाठी कष्टाचे काम आहे. एका एकरामध्ये सुमारे १० क्विंटल हळदीचे उत्पादन अपेक्षीत आहे. सध्याचे बाजारभाव १० हजार रुपये क्विंटल असून त्यात वाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. (वार्ताहर)