शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

जमीन मोबदल्यासाठी शेतकऱ्यांची फरफट

By admin | Updated: April 16, 2016 00:24 IST

गावालगत सिंचन प्रकल्प झाल्यास हरितक्रांती घडून जीवनमान उंचावेल अशी अपेक्षा लवारी येथील शेतकऱ्यांची होती.

निम्न चुलबंद प्रकल्पग्रस्त : मोबदल्यात तफावत, शेतकऱ्यांमध्ये असंतोषलवारी : गावालगत सिंचन प्रकल्प झाल्यास हरितक्रांती घडून जीवनमान उंचावेल अशी अपेक्षा लवारी येथील शेतकऱ्यांची होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी शेती सोडली. मात्र, शासनाने यात जमीनीचा लाभ देताना मोठी तफावत केली आहे. मोबदल्यासाठी शेतकऱ्यांची फरफट होत आहे.साकोली तालुक्यातील लवारी या गावालगत निम्न चुलबंध प्रकल्पाची निर्मिती झाली. दरम्यान जमीन अधिग्रहीत करताना शासनाने गावातील शेतकऱ्यांना २०११ मध्ये ६५ हजार रूपये एकरी भाव दिला. गावाशेजारी प्रकल्प बनत असल्याने शेतकऱ्यांनी हरीतक्रांतीचे स्वप्न बघून त्यांच्या बागायती व कोरडवाहू शेती शासनाने निर्धारित केलेल्या भावात विकल्या. मात्र, चुलबंध नदीच्या पलिकडील वळद गावातील शेतकऱ्यांना यावर्षी त्याच अधिग्रहीत शेतीसाठी शासनाने १० लाख रूपये प्रति एकर मोबदला दिला. त्यामुळे लवारी येथील शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे. केवळ नदी आडवी असलेल्या गावाला देण्यात आलेल्या मोबदल्यात थोडाथोडका नाही तर, सुमारे ९ लाख ३५ हजारांची तफावत आहे. त्यामुळे शासनाने अधिग्रहीत केलेल्या लवारी येथील शेतकऱ्यांच्या जमीनीलाही तोच वाढीव मोबदला द्यावा, अशा मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते, यादोराव मेश्राम, गजानन किरणापुरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. (वार्ताहर)