शेतजमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 05:00 AM2020-05-27T05:00:00+5:302020-05-27T05:01:03+5:30

तुमसर तालुक्यातील दावेझरी (आंबागड) येथील शेतकऱ्यांच्या शेत शिवारातून बावनथडी प्रकल्पाचे उप कालवा (नहर) बनविण्यात आले आहे. गत अनेक वर्षांपासून कालवा (नहर) बनून तयार आहे. पण शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळालेला नाही. कित्येकदा कार्यालयात जाऊन शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आजघडीला कोरोना विषाणूने देशासह राज्यात धुमाकूळ घातलेला आहे.

Farmers did not get compensation for agricultural land | शेतजमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळेना

शेतजमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळेना

Next
ठळक मुद्देएसडीओंना निवेदन : दावेझरी येथील एकही शेतकऱ्यांना मोबदला नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या बावनथडी प्रकल्पाचा उपकालवा तालुक्यातील दावेझरी (आंबागड) येथील शेतकºयांच्या शेतशिवारातून शेतकऱ्यांना जमिनीचा दुप्पट मोबदला मिळणार, या अटीवर तयार करण्यात आले. मात्र अनेक वर्षे लोटली तरी जमिनीचा दुप्पट मोबदला तर सोडाच एक छदामही आतापर्यत मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तात्काळ प्रभावाने शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्यात यावा, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
तुमसर तालुक्यातील दावेझरी (आंबागड) येथील शेतकऱ्यांच्या शेत शिवारातून बावनथडी प्रकल्पाचे उप कालवा (नहर) बनविण्यात आले आहे. गत अनेक वर्षांपासून कालवा (नहर) बनून तयार आहे. पण शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळालेला नाही. कित्येकदा कार्यालयात जाऊन शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आजघडीला कोरोना विषाणूने देशासह राज्यात धुमाकूळ घातलेला आहे. परिणामी शेतकरी व जनसामान्य नागरिकांचा रोजगार हिसकावून बसलेला आहे. आधीच कंबरडे मोडले असलेल्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगावे तरी कसे, असा प्रश्न झाला आहे.
शेतकऱ्यांची होत असलेली होरपळ व अन्यायाबाबतची संपूर्ण हकीकत सांगून शासन स्तरावर तात्काळ प्रभावाने कारवाई करून दावेझरी येथील गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींनीचा मोबदला देण्यात यावा, या आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर यांना देण्यात आले.
शिष्टमंडळात नगराध्यक्ष व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे, जिल्हा महामंत्री मुन्ना पुंडे, जय मोरे, समाजसेवक राजकुमार टेकाम आदी उपस्थित होते.

Web Title: Farmers did not get compensation for agricultural land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.