शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बनावट बीपीएल शिधापत्रिकांची चौकशी

By admin | Updated: June 3, 2016 00:34 IST

गावात खोट्या सन्मानासाठी स्थानिक पुढारी एकमेकांच्या उचापती करतात. त्याचा परिणाम जनतेला भोगावा लागतो

मोहाडी : गावात खोट्या सन्मानासाठी स्थानिक पुढारी एकमेकांच्या उचापती करतात. त्याचा परिणाम जनतेला भोगावा लागतो. असा काहीसा प्रकार देव्हाडा खुर्द या गावात होत आहे. दोन गटानी वर्चस्वासाठी बोगस शिधापत्रिकाची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार तहसिलदार मोहाडी यांचेकडे केली आहे.राजकारणात लाभ घेण्यासाठी पुढारी एकाचे दोन करतात. देव्हाडा खुर्द येथेही असेच घडले आहे. तत्कालीन सरपंचानी आपल्या प्रभावाने बोगस बीपीएलचे कार्ड तयार केले. नियमात बसत नसतानाही सधन लोक याचा लाभ घेत होते. सगळं काही गावात सुरळीत असताना गावातील एका पक्षाचा नेता स्थानिक सरकारी स्वस्त धान्य दुकानदाराच्या पाठीमागे लागला. गावात धान्य उचलण्यासाठी बीपीएल लाभधारकांना मनाई केली. सातत्याने दुकान जोडणे-काढणे प्रकार चालत राहिला. या प्रकाराने गावात सरळ दोन गट पडले. एका गटाने तब्बल ८४ बीपीएल, अंत्योदय शिधापत्रिकाची चौकशी करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांचेकडे तक्रार केली. नंतर दुसऱ्या गटाने २२ कार्डधारकांची चौकशी करावी, असे पत्र दिले. यामुळे तहसिलदार मोहाडी यांनी चौकशीचे आदेश काढले. मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी व पोलीस पाटील यांची चौकशी समिती बसविण्यात आली आहे. देव्हाडा खुर्द येथील १०६ बोगस बीपीएल, अंत्योदय शिधापत्रिकाची चौकशी करावी, असे समितीला निर्देश दिले. बनावट शिधापत्रिकासंबंधी अहवाल सादर करण्याचेही समितीला सांगण्यात आले. चौकशी समिती नेमून महिना झाला. अजुनपर्यंत अन्न पुरवठा शाखेला चौकशी अहवाल आला नाही. तथापि, वारंवार देव्हाडा खुर्द येथे एका स्वस्त धान्य दुकानावर वाद विकोपाला गेले. या वादावर कायमचा प्रश्न प्रशासनाने मिटवला आहे. देव्हाडा खुर्द येथे पुन्हा एक वाढीव स्वस्त धान्य दुकान देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले. १०६ बोगस बीपीएल शिधापत्रिकांची चौकशी झाल्यानंतर सत्य समोर येईल त्याचे खापर गावकरी स्थानिक नेत्यांवर फोडणार आहेत. दहा गावात रास्तभाव दुकाने मंजूरजांभोराटोला, लेंडेझरी, जांभळपाणी, बोंडे, बिटेखारी, दवडीपर, पांजरा फुटाळा, देव्हाडा (खुर्द) धर्मापुरी या दहा गावात स्वस्त धान्य दुकाने मंजूर करण्यात आले आहे.( तालुका प्रतिनिधी)