शहरं
Join us  
Trending Stories
1
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
2
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
3
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
4
हे दशक आपत्तींचे; गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा 
5
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
6
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
7
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
8
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
9
टीईटी पेपरफुटी प्रकरण ‘तारीख पे तारीख’मध्ये अडकले; सर्व आरोपी आता जामिनावरही सुटले 
10
हवामान बदलामुळे भारतासह जगभरातील नद्यांतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वेगाने घट
11
धर्मादाय आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर टाटा ट्रस्टची महत्त्वाची बैठक स्थगित
12
एक विधान अन् इस्रायल, यूएई गुप्त मैत्रीचा पर्दाफाश!
13
आम्ही दोघेच जगाचे महान नेते; दौरा ऐतिहासिक म्हणत ट्रम्प यांनी जिनपिंग भेटीचे ‘जी-२’ असे केले नामकरण
14
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
15
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
16
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
17
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
18
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
19
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
20
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

अवैध मुरूम उत्खननावर आळा बसविण्यात अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 06:00 IST

सालई खुर्द हद्दीत उसर्रा रस्त्यावर गट क्रमांक ८१५/२ जागेत ५०० ब्रास उत्खननाची परवानगी असताना १९०० ब्रासपेक्षा अधिक मुरूमाचे उत्खनन करण्यात आले. तसेच डोंगरगाव रस्त्यालगत गट क्रमांक १७४ मध्ये ५०० ब्रासची परवानगी असताना २३०० ब्रास अधिक मुरूम उत्खनन करण्यात आला. ४२०० ब्रास मुरूमाचे अवैध उत्खनन करण्यात आल्याचे सकृत दर्शनी दिसत आहे.

ठळक मुद्देप्रशासन हतबल : रामटेक-तुमसर मार्गाच्या बांधकामासाठी अवैध मुरूमाचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : नसर्गिक गौण खनिज उपसा व पर्यावरणाला हानीकारक प्रकारासंदर्भात शासनाचे कठोर धोरण आहे. असे असतानाही तालुक्यात मुरूमाचे अवैध उत्खनन केले जात आहे. सालई खुर्द, पालडोंगरी, जांब, धोप, उसर्रा हद्दीत परवानगी नसताना मुरूमाचे उत्खनन केले जात आहे. यातील बहुतांश मुरूम रामटेक-तुमसर मार्गाच्या बांधकामासाठी वापर जात असल्याची माहिती आहे.
मोहाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची चोरी होत आहे. रेतीचा विषय तर सर्वश्रृत आहे. या पाठोपाठ आता मुरूमाचेही अवैध उत्खनन केले जात आहे. राजरोसपणे हा प्रकार सुरू असताना महसूल विभागाचे अधिकारी मात्र याबाबत कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. गौण खनिज तस्करांपुढे प्रशासन हतबल झाल्याचे दिसत आहे.
सालई खुर्द हद्दीत उसर्रा रस्त्यावर गट क्रमांक ८१५/२ जागेत ५०० ब्रास उत्खननाची परवानगी असताना १९०० ब्रासपेक्षा अधिक मुरूमाचे उत्खनन करण्यात आले. तसेच डोंगरगाव रस्त्यालगत गट क्रमांक १७४ मध्ये ५०० ब्रासची परवानगी असताना २३०० ब्रास अधिक मुरूम उत्खनन करण्यात आला. ४२०० ब्रास मुरूमाचे अवैध उत्खनन करण्यात आल्याचे सकृत दर्शनी दिसत आहे. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. परवानगी ५०० ब्रासची असली तरी पाच पट मुरूम खोदून त्याची वाहतूक केली जाते. बांधकाम कंपनीचे ट्रक अहोरात्र या ठिकाणावरून धावताना दिसतात.

दुसऱ्याच गटात उत्खनन
कोणत्याही शासकीय कामावर गौण खनिज वापरण्यासाठी रॉयल्टी बिल्ला जोडल्याशिवाय देयके मंजूर होत नाही. परंतु कंत्राटदार कंपन्या पैसा वाचविण्यासाठी परवानगी मिळालेल्या जागेतून उत्खनन न करता जेथे काम सुरू आहे त्या जवळच्या शासकीय जागेतून किंवा खाजगी जागेतून उत्खनन करतात. हा प्रकार मोहाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परवानगी असलेल्या गट सोडून दुसºयाच गटात उत्खनन केल्या जात आहे.

नियोजित जागा सोडून इतर जागेतून उत्खनन होत असेल तर चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. रस्ता बांधकामासाठी गौण खनिज उत्खननाची संबंधीत कंपनीने परवानगी घेतली आहे.
-धनंजय देशमुख, तहसीलदार मोहाडी.