कोविड केंद्रातील ऑक्सिजन पाईपमध्ये लीकेज होऊन स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:36 IST2021-04-04T04:36:34+5:302021-04-04T04:36:34+5:30

भंडारा : दहा निष्पाप बालकांचे आगीत बळी गेलेल्या येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवीन कोविड केअर वाॅर्डात शुक्रवारी रात्री ऑक्सिजन ...

Explosion due to leakage in the oxygen pipe in the covid center | कोविड केंद्रातील ऑक्सिजन पाईपमध्ये लीकेज होऊन स्फोट

कोविड केंद्रातील ऑक्सिजन पाईपमध्ये लीकेज होऊन स्फोट

भंडारा : दहा निष्पाप बालकांचे आगीत बळी गेलेल्या येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवीन कोविड केअर वाॅर्डात शुक्रवारी रात्री ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पाईपला लीकेज होऊन स्फोट झाला. सुदैवाने हा प्रकार लक्षात येताच तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र विभागात नवीन कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या वाॅर्डात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी सेंट्रल पाईप लाईन तयार करण्यात आली. शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ऑक्सिजन सिलिंडर लावताना पाईपमध्ये लीकेज होऊन स्पार्क झाला. काही कळायच्या आतच स्फोट होऊन पाईपला आग लागली. संभाव्य धोका लक्षात घेता तातडीने वाॅर्डातील रुग्णांना बाहेर काढण्यात आले आणि आग विझविण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रियाज फारुकी आणि पथकाने ताबडतोब कारवाई करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रियाज फारुकी यांना विचारणा केली असता कोणतीही हानी झाली नाही, सर्व रुग्ण सुरक्षित असून पर्यायी ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली असून सेंट्रलाईज ऑक्सिजन पुरवठा रविवारी दुपारपर्यंत सुरळीत होईल असे सांगितले.

गत जानेवारी महिन्यात येथील शिशू केअर युनिटला आग लागून दहा निष्पाप बालकांचा बळी गेला होता. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला होता. आता शुक्रवारी रात्री घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली. सुदैवाने वेळीच आग नियंत्रणात आल्याने मोठा अनर्थ टळला.

Web Title: Explosion due to leakage in the oxygen pipe in the covid center