सिलेंडरच्या स्फोटात घर उद्ध्वस्त, सुदैवाने जीवितहानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 02:53 PM2021-09-27T14:53:39+5:302021-09-27T14:58:22+5:30

लाखनी येथील आंकोश शिवनाथ आत्राम यांच्या राहत्या घरी सकाळी ७ च्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. घटनेच्या वेळी घरातील सर्व मंडळी बाहेर असल्याने मोठा अनर्थ टळला.

The explosion of the cylinder destroyed the house, fortunately no casualties | सिलेंडरच्या स्फोटात घर उद्ध्वस्त, सुदैवाने जीवितहानी नाही

सिलेंडरच्या स्फोटात घर उद्ध्वस्त, सुदैवाने जीवितहानी नाही

Next

भंडारा : लाखनी तालुक्यातील गुरढा येथे एका घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण घरच उद्ध्वस्त झाले आहे. ही घटना सोमवारी सकाळी ७ वाजता घडली. सुदैवाने जीवितहानी टळली.

माहितीनुसार, आंकोश शिवनाथ आत्राम यांच्या राहत्या घरी सकाळी ७ च्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. घटनेच्या वेळी घरातील सर्व मंडळी बाहेर असल्याने मोठा अनर्थ टळला.

या स्फोटात घरातील अन्नधान्य, कपडे, कपाट यासह जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. सदर घटनेची माहिती मिळताच लाखनी येथील नायबतहसीदार उरकुडकर, समन्वयक नरेश नवखरे, तलाखी देशमुख, सरपंच श्रीराम बावनथडे यांनी घटनास्थळी पोहचून माहिती घेतली.

Web Title: The explosion of the cylinder destroyed the house, fortunately no casualties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.