शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

आधी केले बहिष्कृत, नंतर घेतला जीव

By admin | Updated: August 30, 2016 00:15 IST

संशयाचे भूत एकदा मानगुटीवर बसले की जात नाही. याच संशयातून दावेझरी (टोला) येथील ग्रामस्थांनी ढोक दाम्पत्यांवर बहिष्कार टाकला होता.

प्रकरण पती-पत्नीच्या खुनाचे : आरोपींना कठोर शिक्षा करा, संशयाच्या भूताने ग्रामस्थांना झपाटलेभंडारा/तुमसर : संशयाचे भूत एकदा मानगुटीवर बसले की जात नाही. याच संशयातून दावेझरी (टोला) येथील ग्रामस्थांनी ढोक दाम्पत्यांवर बहिष्कार टाकला होता. या बहिष्कृत दाम्पत्यांची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. दरम्यान गावात दूषित पाण्यामुळे जलजन्य आजाराची लागण होऊन दोघांचा मृत्यू झाला. आणि गावकऱ्याच्या डोक्यात संशयाचे चक्र सुरू झाले. या संशयाच्या चक्रातून ढोक दाम्पत्यांचा खून झाला.दावेझरी (टोला) ५० ते ५५ घरांची लोकवस्ती. दगडी खाणीत मजुरी करणे हा तिथल्या लोकांचा रोजगार. हातावर आणून व पानावर खाणे असा नित्यक्रम. अशातच गावात दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारामुळे घरांघरात लहान मुले, महिला व वृध्द आजारी पडले आहे. गावात घराघरात आजार असतानाही आरोग्य विभाग यापासून अनिभज्ञ आहे. थातुरमातुर औषधोपचाराने आजार बरा होण्यापेक्षा वाढला. दरम्यान गंगाधर शेंडे यांची पत्नी सुनिता शेंडे यांचा तर मदन कुंभरे यांचा मुलगा राज कुंभरे (५) याचा २६ आॅगस्टला आजाराने मृत्यू झाला. या मृत्यूला ढोक दाम्पत्य जबाबदार असल्याचा ग्रामस्थांचा गैरसमज झाला. त्यामुळे या दाम्पत्याला ठार करण्याचा कट रचण्यात आला. सायंकाळच्या सुमारास डझनभर ग्रामस्थ ढोक यांच्या घरावर चालून गेले. घराच्या विजेचा मीटर तोडला. अन्य साहित्याची तोडफोड केली. जीवाच्या आकांताने यादोराव व पत्नी कौशल गावातील मंदिरात आश्रयाला गेले. त्यामागोमाग जमाव मंदिराच्या दिशेने चालून आला. जमावाच्या हातात लाठ्या काठ्या होत्या. मंदिरातून बाहेर ओढून या दाम्पत्यांना चौकात नेण्यात आले. तिथे बेदम मारहाण करण्यात आली. यात यादोराव व पत्नी कौशल यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तीन किमी दूर फरफटत नेऊन दगडी खाणीच्या परिसरात मृतदेह फेकून दिला.शनिवारला रात्री घडलेल्या या प्रकाराची रविवारला कुजबुज सुरू झाली. गावातीलच एकाकडून पोलिसांना कळले. पोलीस पोहोचले. शोधमोहीम सुरू झाली आणि अवघ्या काही वेळातच मृतदेह सापडले. त्यापाठोपाठ आरोपीही सापडू लागले. आरोग्य विभाग अनभिज्ञ आहे. दावेझरी गावात आजाराची साथ पसरलेली असतानाही आरोग्य विभाग अनभिज्ञ आहे. जलजन्य आजाराने नागरिक त्रस्त आहेत. परिणामी दोघांचे जीव गेल्यामुळे गावात जादूटोणा केल्याचा संशय बळावू लागला. अख्ख्या गावालाच जादुटोण्याने झपाटले आहे. खूनानंतर मृतदेह तुमसर रूग्णालयात आणण्यात आले होते. तोपर्यत ढोक दाम्पत्यांची दोन्ही मुले तुमसर पोहोचली. परंतु ते इतके दहशतीत होते की दावेझरीला जावू शकले नाही. मृतदेह कुजलेले असल्यामुळे शवविच्छेदनासाठी नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. नागरी हक्क अधिकाऱ्यांची भेटदुसऱ्या दिवशीही गावात शांतता कायम आहे. घटनास्थळाला नागरी सुविधा हक्क अनुसूचित जाती संरक्षण अधीक्षक निर्मलादेवी व कुंदा तिडके यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. मंगळवारला आरोपीना न्यायालयात हजर केले जाणार आहे. घटेनचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जोगदंड करीत आहे. (लोकमत चमू)अंनिसने नोंदिविला निषेधसाकोली : गावात जादुटोणा केल्याने महिला व एका बालकाचा मृत्यू झाला असा संशय घेवून ढोक कुटूंबातील दावेझरी टोला गावात भर चौकात मारुन हत्या करण्यात आली. व मृतदेह जंगलात फेकण्यात आले. याचा घटनेचा अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला. या प्रकरणात जे लोक सहभागी त्यांच्यावर कठोर कारवाईची, मागणी अंधश्रध्दा निर्मुलन समितीने केली आहे. जादुटोणा विरोधी कायदयाची कायदेशीर अंमलबजावणी करुन पोलीस ठाण्यामार्फत गावागावात प्रबोधन कार्यक्रम करण्याची गरज असल्याचे जिल्हा संघटक वंसत लाखे, जिल्हाध्यक्ष मदन बांडेबुचे, जिल्हा उपाध्यक्ष डी. जी. रंगारी, ग्यानचंद जांभूळकर, मुलचंद कुकडे, प्रिया शहारे, यशवंत उपरीकर, प्रोफेसर बहोकर, के. एस. रंगारी यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)