शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाकडून सहनशीलतेची परीक्षा...

By admin | Updated: February 24, 2016 00:34 IST

खेड्यापाड्यातील बहुतांश रस्ते डांबरीकरणाचे झाले. कालांतराने गुळगुळीत झालेल्या या रस्त्यांची सध्या दैनावस्था झाल्याने ...

रोजचा जीवघेणा प्रवास : प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, रस्ता दुरूस्तीची मागणीराजू बांते मोहाडीखेड्यापाड्यातील बहुतांश रस्ते डांबरीकरणाचे झाले. कालांतराने गुळगुळीत झालेल्या या रस्त्यांची सध्या दैनावस्था झाल्याने अपघात अन् मृत्यूची प्रतीक्षा करीत असल्याचे दिसून येत आहेत. त्यातलाच मोहाडी ते खमारी, मोहाडी ते कान्हळगाव हे दोन्ही रस्ते जनतेच्या सहनशीलतेची परीक्षा बघत आहेत, असेच म्हणावे वाटते.मेक इन इंडियाची संकल्पना मांडणाऱ्या भाजपा शासनाची खेड्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत चालले आहे. रहदारीचे रस्ते जीव घेणे ठरत आहेत. मोहाडी येथील चौंडेश्वरी मार्गापासून ते खमारी (बु.) पर्यंतचा तेरा किलोमीटरचा डांबरीकरणाचा रस्ता मोठा अपघात अन् मूत्यूची प्रतिक्षा करीत आहे. तसेच कान्हळगाव, सिरसोलीपर्यंतचा रस्ता खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावर पावलोपावली मोठमोठे खड्डे पडले आहेत. जेव्हापासून डांबरीकरणाचे हे दोनही रस्ते झाले तेव्हापासून त्या रस्त्यांना डांबर लागले नाही. किरकोळ दुरूस्ती झाल्या पण, पावसाळा आला की त्या रस्त्याची जूनीच अवस्था होत असते. या किरकोळ दुरूस्तीमधून ठेकेदारांचे खिसे भरले. पण, रस्त्याची अवस्था कायमच राहत चालली आहे.मोहाडीच्या पश्चिमेकडील मोरगाव, महालगाव, कान्हळगाव, सिरसोली, वडेगाव, सालेबर्डी, पांढराबोडी, हरदोली, मांडेसर, खुटसावरी, खमारी, पिंपळगाव आदी गावाची रहदारी कान्हळगाव-मोहाडी या दोन मार्गाने पहाटेपासून सुरू होते. विद्यार्र्थीही सायकलने शाळांमध्ये ये-जा करीत असतो. रस्त्याने वाहन चालवित असताना नजर चुकली तर खड्यात पडावे लागते. पण, संवेदनाहीन झालेले जनप्रतिनिधी अन् प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहेत. मोहाडीपासून खमारीपर्यंतचा रस्ता या रस्त्याने लोकप्रतिनिधी चारचाकी वाहने नेणेही टाळतात. कारण, गाडीला इजा अन् शरीराला धक्का लागू नये, यासाठी ही सावधानता बाळगतात. खमारी दत्तक घेतले. पण, त्या खमारीला जाणाऱ्या रस्त्याची परिस्थितीची जाणीव असतानाही कोणीच कसे बोलत नाही याचे जनतेला आश्चर्य वाटत आहे. मोहाडीच्या पश्चिमेकडील गावांचे सरपंचही रस्त्याच्या दुरूस्तीसाठी पुढाकार घ्यायला तयार नाहीत. चौंडेश्वरी मोहाडी ते खमारी, कान्हळगाव रस्त्याची दुरूस्ती प्रस्तावित आहे. आमदार दत्तक ग्राम खमारीच्या प्रोग्राममध्ये सदर रस्ता दुरूस्तीसाठी घालण्यात आलेला आहे. पण, त्या प्रस्तावाला मंजुरी नाही अन् निधीही उपलब्ध नाही. मंजुरी अन् निधीसाठी दोन्ही रस्ते प्रतीक्षा करीत असल्याची माहिती जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.चौंडेश्वरी ते खमारीकडे जाणारा रस्ता जि.प. बांधकाम विभागाकडे येतो. त्या रस्त्याची दुरूस्ती झाली पाहिजे. आमदार चरण वाघमारे एक कोटी रूपये मंजूर करण्यास तयार होते. त्यासाठी जि.प. भंडाराची एनओसी लागते. लोकप्रतिनिधी म्हणून एनओसी मागितली. पण, अद्यापर्यंत जि.प. ने एनओसी दिली नाही. त्यामुळे तो रस्ता तसाच पडून आहे.-हरिश्चंद्र बंधाटे, सभापती, पं.स. मोहाडी.चौंडेश्वरी ते खमारी, मोहाडी ते कान्हळगाव ही दोन रस्ते दुरूस्तीसाठी पक्षांनी राजकारण करू नये. नागरिकांच्या सोयीसाठी रस्ता दुरूस्तीचा मार्ग मोकळा व्हावा.-अंकुश दमाहे, उपसरपंच ग्रामपंचायत, सिरसोली.