शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशद्वार रस्ता खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 05:00 IST

रस्ता बांधकामाला मंजुरी मिळाली असूनही कामाचा येथे पत्ता नाही. देव्हाडी मुख्य रस्ता तुमसर शहराचे प्रवेशद्वार आहे. रेल्वेस्थानक तथा गोंदिया राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. गत दीड ते दोन वर्षापासून रस्त्यावर खड्डे पडले आहे. रस्त्याची चाळण झाली असून खड्ड्यातून येथे मार्गक्रमण करावे लागत आहे. सदर रस्त्यावर गत वर्षी तीन युवकांना जीव गमवावा लागला.

ठळक मुद्देतुमसरातील प्रकार : बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर शहराचा प्रवेशद्वार रस्ता खड्डेमय झाला असून सदर रस्त्यावर अपघात होऊन आतापर्यंत तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.जवळपास दोन वर्षांपासून रस्त्याची दैनावस्था झाली आहे. दररोज ३० ते ३५ हजार नागरिक या रस्त्याने ये जा करतात. तुमसर-देव्हाडी रस्त्याची व्यथा कुणीच ऐकायला तयार नाही. या रस्त्यावर अर्ध्या फुटाचे खड्डे पडले आहेत. रस्ता बांधकामाला मंजुरी मिळाली असूनही कामाचा येथे पत्ता नाही.देव्हाडी मुख्य रस्ता तुमसर शहराचे प्रवेशद्वार आहे. रेल्वेस्थानक तथा गोंदिया राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. गत दीड ते दोन वर्षापासून रस्त्यावर खड्डे पडले आहे. रस्त्याची चाळण झाली असून खड्ड्यातून येथे मार्गक्रमण करावे लागत आहे. सदर रस्त्यावर गत वर्षी तीन युवकांना जीव गमवावा लागला.विधानसभा निवडणुकीपूर्वी रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करून देव्हाडी मार्गावरील शेकडो वृक्षांची कत्तलही करण्यात आली होती. परंतु रस्ता बांधकामाचा अजूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे.सार्वजनिक बांधकाम खात्याचे त्यावर नियंत्रण आहे. मोठ्या खड्ड्यात हॉट मिक्स घालून बुजविण्यात आले. अजूनही शेकडो खड्डे तसेच आहेत. मिटेवानी ते देव्हाडी दरम्यान रस्ता बांधकामाला मंजुरी प्रदान करण्यात आली.परंतु कासवगतीने कामे सध्या सुरु आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. मिटेवानी देव्हाडी रस्ता हायब्रीड रस्ता आहे. यात ६० टक्के शासन तर ४० टक्के कंत्राटदाराची रक्कम गुंतवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे कार्यकारी अभियंता दर्जाचे अधिकाऱ्यांचे संबंधित कंत्राटदारांचे अभियंते ऐकवात अशी माहिती आहे. दोन दिवसापूर्वी कार्यकारी अभियंता एस.बी. नंदनवार यांनी संपूर्ण रस्त्याची पाहणी करून खड्डे भरण्याचे निर्देश दिले होते. परंतु केवळ थातूरमातूर खड्डे बुजविले असूनही मोठ्या प्रमाणात येथे खड्डे आहेत. वरिष्ठांच्या आदेशानंतरही कारवाई होत नसल्याचे दिसून येते.संबंधित कंत्राटदाराला देव्हाडी मार्गावरील खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले आहेत. लवकरच खड्डे बुजविण्यात येतील.-एस.बी. नंदनवार, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग भंडारा

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा