शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

धानोरी येथील भागवत सप्ताहाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:41 IST

पवनी : तालुक्यातील धानोरी येथे हनुमान मंदिराच्या आवारात श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. प्रवचनकार ह.भ.प. रायभान दाणी ...

पवनी : तालुक्यातील धानोरी येथे हनुमान मंदिराच्या आवारात श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. प्रवचनकार ह.भ.प. रायभान दाणी महाराज यांनी प्रवचनातून अंधश्रद्धा निर्मूलन, ग्राम स्वच्छता, सर्वधर्म समभाव व व्यसनमुक्ती अशा विविध विषयांवर ग्रामस्थांना सप्ताहादरम्यान मार्गदर्शन केले.

दैनंदिन कार्यक्रमात ग्राम स्वच्छता, रामधून, प्रवचन, भारुड, कीर्तन या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. समारोपप्रसंगी गोपालकाला करण्यात आला. या वेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकरराव तेलमासरे, माजी पंचायत समिती सभापती बंडू ढेंगरे, माजी जि. प. सदस्य विजय सावरबांधे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तोमेश्वर पंचभाई, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अशोक पारधी, माजी सरपंच विश्रांती घुटके, पोलीस पाटील लिनता जांभुळे, सुरेश पारधी व गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थित अतिथींचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनानंतर गोपालकाला वितरित करण्यात आला. महाप्रसादाने भागवत सप्ताहाचा समारोप करण्यात आला. सप्ताह समिती प्रमुख नरेश जुमळे यांनी समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. यशस्वीतेसाठी समिती सदस्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.