शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षित जागांवर अतिक्रमण

By admin | Updated: October 4, 2015 01:27 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे बसेसमध्ये अंध, अपंग, पत्रकार, महिला, आमदार, खासदार व स्वातंत्रसैनिक

एसटीतील प्रकार : अपंगांची गैरसोय, परिवहन महामंडळाचा फार्सभंडारा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे बसेसमध्ये अंध, अपंग, पत्रकार, महिला, आमदार, खासदार व स्वातंत्रसैनिक यांच्यासाठी जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. या सीटच्या मागे या जागा कुणासाठी राखीव याचा स्पष्ट उल्लेख आहे. परंतु बसचा वाहक या निर्णयाची अंमलबजावणी करीत नसल्याने अंध, अपंगांसह महिला प्रवाशांना राखीव ऐवजी रांगेत उभे राहून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. महामंडळाच्या प्रवासी बसमध्ये ठराविक सीट्स या राखीव आहेत. त्या सीटच्या मागे त्या कुणासाठी राखीव आहे. याचा उल्लेख आहे व ज्या सीटच्या मागे नमूद नसेल त्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत, असे समजण्यात येत असते. राज्य परिवहन महामंडळातर्फे बसमध्ये उदात्त हेतुने जागा राखीव ठेवल्या असल्या तरी वाहकाद्वारा अंमलबजावणीच होत नसल्याने महामंडळाच्या उद्देशाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. बसस्थानकावर बस येताच मिळेल ती जागा बळकावण्याची प्रवाशांची मानसिकता असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे आबालवृद्धांना डावलून तरुणतुर्क जागा मिळविण्यासाठी धडपड करतात. बसमध्ये खिडकीमधून रुमाल, दुपट्टा व कॅरीबॅग टाकून ती जागा जणू आरक्षित झाली या अर्विभावाने वावरतात. अंध, अपंग व महिलांना मात्र गर्दीतून वाट काढत जागा मिळविणे शक्य होत नाही. परिणामी महामंडळाद्वारा या प्रवाशांना त्यांची हक्काची जागा देणेदेखील कठीण होते. शासनाने विशेष सुविधा दिली असली तरी त्यांना उभे राहूनच प्रवास करावा लागतो, हेही तेवढेच सत्य आहे. याकडे शासनासह विभागीय नियंत्रकांनी लक्ष देण्याची गरज आहे.अंध, अपंग, महिला व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या राखीव जागेवर बसविण्याचे काम वाहकाचे आहे. अंध, अपंग प्रवाशांना चढविणे, उतरविणे, त्यांना त्यांच्या हक्काची जागा देणे ही सर्व जबाबदारी वाहकाची आहे. (प्रतिनिधी)