शहरं
Join us  
Trending Stories
1
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
2
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
3
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
4
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
5
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
6
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
7
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
8
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
9
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
10
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
11
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
12
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
13
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
14
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
15
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
16
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
17
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
18
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
19
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
20
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

दारुबंदीसाठी सालईत एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 05:00 IST

विशेष ग्रामसभा घेऊन दोन महिन्यांपूर्वी दारुबंदीचा ठराव घेतला. याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आज सोमवारी महिलांनी दवंडी देत गावातून रॅली काढली. महिलांचा हा दुर्गावतार पाहून दारुड्याच्या आणि विक्रेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली. पोलिसांच्या मदतीने दारुभट्टीवर धाड मारुन महिलांनी दारु उद्ध्वस्त केली.

ठळक मुद्देग्रामसभेत ठराव : दंवडी देत शेकडो महिलांनी काढली गावात रॅली

रमेश लेदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
जांब (लोहारा) : गावातील दारुमुळे संत्रस्त झालेल्या मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द येथील महिलांनी एकत्र येत दारुबंदीसाठी एल्गार पुकारला. विशेष ग्रामसभा घेऊन दोन महिन्यांपूर्वी दारुबंदीचा ठराव घेतला. याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आज सोमवारी महिलांनी दवंडी देत गावातून रॅली काढली. महिलांचा हा दुर्गावतार पाहून दारुड्याच्या आणि विक्रेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली. पोलिसांच्या मदतीने दारुभट्टीवर धाड मारुन महिलांनी दारु उद्ध्वस्त केली.
मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द या गावात काही वर्षांपासून दारुचा महापूर वाहत आहे. दारुड्यांचा सर्वाधिक त्रास महिलांना सहन करावा लागतो. परिसरात गुन्हेगारीही वाढू लागली होती. त्यामुळेच महाराष्टÑ राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियानांतर्गत सहेली ग्रामसंघाच्या महिला एकत्र आल्या. गावात कोणत्याही परिस्थितीत दारुबंदी करण्याचा विडा उचलला. त्यासाठी सालई खुर्द ग्रामपचांयतीनेही सहकार्य केले. १३ नोव्हेंबरला विशेष ग्रामसभा घेवून दारुबंदीसाठी ठराव घेण्यात आला. या ठरावाला सर्वांनी एक मताने मंजूर देऊन १० जानेवारीपासून गावात दारुबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यानच्या काळात महिलांनी दारु विक्रेते आणि मद्यपीचे समुपदेशन करुन त्यांना दारुपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. १० जानेवारी हा दारुबंदीचा दिवस आला. तरी दारुविक्रेते त्याला योग्य प्रतिसाद देत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे महिलांनी ही माहिती आंधळगाव पोलीसांना दिली. पोलिसांनी दारुबंदीसाठी पुढाकार घेतला. पोलिसांच्या उपस्थितीत ३६० महिलांनी गावात दारुविरोधी दवंडी देत रॅली काढली. या रॅलीत ग्रामसहेली मंडळाच्या महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वी मंजूर झालेल्या दारुबंदीचा ठराव प्रत्यक्ष अमंलात आणण्यासाठी महिलांनी कंबर कसल्याचे दिसून आले.
आता दर आठवड्याला एकदा गावातून नशामुक्त गाव रॅली काढण्यात येणार आहे. गावकऱ्यांनी या महिलांच्या उपक्रमाचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. पोलीसही त्यांना सहकार्य करीत आहे.

महिलांनी उद्ध्वस्त केली दारुभट्टी
गावात दारुबंदीसाठी रॅली काढल्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत महिलांनी गावातील दारुभट्टीवर धाड मारली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात दारु जप्त करुन पोलिसांच्या हवाली केली. यावेळी आंधळगावचे ठाणेदार दीपक वानखेडे, पोलीस उपनिरीक्षक फुकट आदी उपस्थित होते.

दारुबंदीसाठी महिलांना आपण पुर्ण सहकार्य करणार आहोत. ते माझे कर्तव्यच आहे. गावातील अवैध व्यवसायावर अंकुश आणण्यासाठी पोलीस तत्पर आहे.
- दिपक वानखेडे, ठाणेदार

टॅग्स :Socialसामाजिक