शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये साकोलीत रोहयोची कामे जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 05:01 IST

लॉकडाऊनमुळे जवाळपास चाळीस दिवस मजुरांना घरीच बसून राहावे लागले होते. मात्र त्यानंतर शासनाने मजुरांना गावी पाठविण्याची सोय केली. त्यामुळे कामासाठी बाहेर राज्यात गेलेले मजूर आपल्या राज्यात परत आले आहेत. सध्या या मजुरांना काम नाही. त्यामुळे या मजुरांच्या हाताला काम देणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने जास्तीत जास्त रोहयोची कामे सुरु करावी असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

ठळक मुद्दे२३ हजार मजुरांना काम, कोरोनाच्या सावटातही मजुरीसाठी धडपक

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे सुरु करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे यावर्षी कोरोनामुळे बाहेर गावूह परत आलेल्या मजुरांची संख्या अधिक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा मजुरांचा आकडा अधिकच आहे. सध्या साकोली तालुक्यात २३ हजार ११७ रोजगार हमीच्या कामावर असून कोरोनाच्या सावटातही मजुरांची मजुरीसाठी धडपड सुरु आहे.लॉकडाऊनमुळे जवाळपास चाळीस दिवस मजुरांना घरीच बसून राहावे लागले होते. मात्र त्यानंतर शासनाने मजुरांना गावी पाठविण्याची सोय केली. त्यामुळे कामासाठी बाहेर राज्यात गेलेले मजूर आपल्या राज्यात परत आले आहेत. सध्या या मजुरांना काम नाही. त्यामुळे या मजुरांच्या हाताला काम देणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने जास्तीत जास्त रोहयोची कामे सुरु करावी असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात रोजगार हमीची कामे सुरु झाली असून मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. साकोली तालुक्यात पारंपारिक शेती व्यवसाय व शेतीच्या कामाव्यतिरिक्त इतर रोजगाराच्या सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे साकोली तालुक्यातील बहुतांश मजुरांचे दरवर्षीच परराज्यात, परजिल्ह्यात कामाच्या शोधासाठी जात होते. त्यामुळे रोजगार हमीच्या कामासाठी मजूर पाहिजे तेवढे मिळत नव्हते. त्यामुळे कामासाठी मजुरांची प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र यावर्षीची परिस्थिती जरा वेगळीच आहे.कोरोना रोगाच्या भीतीमुळे परराज्यात, परजिल्ह्यात कामासाठी गेलेल्या मजुरांनी आपल्या घराचा रस्ता पकडला व गावी परत आले. मात्र गावात आल्यावर आता त्यांना रोजगार नाही. त्यामुळे त्यांना आता रोजगार हमीच्या कामाचा आधार मिळाला आहे. या कामामुळे त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी रोजगार हमीच्या कामावरील मजुरांची संख्या ही अधिकच आहे.त्या मजुरांनाही मिळणार रोजगाराची संधीलॉकडाऊन काळात परप्रांतातून किंवा परजिल्ह्यातून स्वगावी परतलेल्या मजुरांनाही महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक मजूर कामधंदे उपलब्ध नसल्याने परत आले आहेत. अशा मजुरांना रोहयोची कामे उपलब्ध होऊ शकतात. काहींनी याचा लाभही घेण्यास सुरुवात केली आहे. नोंदणी करून खात्यातच मजुरीची रक्कम जमा होत असल्याने आर्थिक चणचणही दूर होणार आहे. जिल्ह्यात ५४५ ग्रामपंचायती अंतर्गत ४०४ ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमी योजनेची कामे सुरु आहेत. भंडारा तालुक्यातील ५५, लाखांदूर ४४, लाखनी ६२, मोहाडी ६१, पवनी ६३, साकोली ५० व तुमसर तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींनी रोहयोची कामे सुरु केली आहेत.

टॅग्स :government schemeसरकारी योजना