करडीत रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:01 IST2019-10-01T05:00:00+5:302019-10-01T05:01:06+5:30

रस्ते कंत्राटदार व विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी कुरण ठरले आहेत. परिसरातील एकही रस्ता चांगल्या स्थितीत नाही. रस्ते दुरुस्तीच्या नावावर मलाई खाण्याचे काम झाले. करडी ते पालोरा मार्गावर विद्युत उपकेंद्राजवळ मोरीचे बांधकाम करताना व्यवस्थित दबाई न केल्याने आज त्या ठिकाणी खोल खड्डा व आडवी नाली पडली आहे.

Eclipse potholes on muddy roads | करडीत रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण

करडीत रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण

ठळक मुद्देकंत्राटदारांच्या चुकांचा परिणाम : सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी


लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी परिसरातील सर्व रस्त्यांना खोल खड्डे, आडव्या नाल्या व तुटलेल्या कडांचे ग्रहण लागले आहे. रस्ते विकासाचा मार्ग प्रशस्त करतात. परंतु हेच रस्ते कंत्राटदार व विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी कुरण ठरले आहेत. परिसरातील एकही रस्ता चांगल्या स्थितीत नाही. रस्ते दुरुस्तीच्या नावावर मलाई खाण्याचे काम झाले. करडी ते पालोरा मार्गावर विद्युत उपकेंद्राजवळ मोरीचे बांधकाम करताना व्यवस्थित दबाई न केल्याने आज त्या ठिकाणी खोल खड्डा व आडवी नाली पडली आहे.
करडी परिसर विकासापासून कोसो दूर आहे. कोका वन्यजीव अभयारण्य व नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या सानिध्यात वसलेल्या या भागाला कमाईचे साधन म्हणून वापरले गेले. त्यामुळे परिसरात सिंचनाच्या कोणत्याही सुविधा नाही. काही तलावांची तात्पुरती मलमपट्टी करून स्वत:ची पाठ थोपटण्यात आली. वैनगंगा नदी खोºयातील सुपीक शेती तसेच निसर्गाचे वरदान लाभले असताना पाहिजे तसे उद्योग लागले नाही. मोहाडी तालुक्याशी जोडणाºया पुलाचा प्रश्न सोडविता आला नाही. वन्यप्राण्यांपासून गावाचे व पिकांचे नुकसान होत असताना तारेचे कुंपण करण्याचे आश्वासन पूर्ण झाले नाही.
करडी परिसरातील पालोरा ते खडकी, पालोरा ते बोरगाव, खडकी ते करडी, बोरगाव ते पांजरा, करडी ते देव्हाडा, निलज खुर्द पोचमार्ग, मुंढरी खुर्द व मुंढरी बुज पोचमार्ग, निलज बुज पोचमार्ग, जांभोरा ते पालोरा आदी व अन्य रस्ते यातना भोगत आहेत. पर्यायाने या रस्त्यांवरून वाहतूक करणाºया लोकांचे हाल होत आहेत. रस्त्यांच्या दुरुस्ती संबंधाने अनेकदा मागणी करण्यात आली. परंतु एक ते दोन किलोमीटर पर्यंतच्या रस्त्यांची दुरुस्ती करून स्वत:ची पाठ थोपटण्यात आली. काही रस्त्यांना तर केवळ बीबीएम करून मोकळे सोडण्यात आले. बोंडे ते मुंढरी बुज. रस्त्यांची अवदशा तर त्यापेक्षाही वेगळीच आहे. विकासाच्या नावावर रस्त्याच्या दोन्ही बाजू तीन मीटरपर्यंत खोदण्यात आल्या. परंतु उन्हाळ्यापासून काम सुरु होण्याचे नाव नाही. निव्वळ दुरुस्तीच्या नावावर मलाई खाण्याचे धोरण राबविण्यात आल्याने आज पावसाळ्यानंतर सर्वच रस्त्याची पार एैसीतैसी झाली आहे. करडी ते पालोरा मार्गावरील विद्युत उपकेंद्राजवळ पडलेली खोल नाली आता वाहतुकदारांसाठी जीवघेणी ठरू पाहत आहे.

Web Title: Eclipse potholes on muddy roads