शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांच्या आदेशाला डेप्युटी सीईओंचा खोडा

By admin | Updated: May 3, 2017 00:35 IST

जिल्हा परिषदने ११७ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या केल्या. यात अनियमितता असल्याने अपात्र शिक्षकांच्या बदल्या रद्द करून ...

प्रकरण आंतरजिल्हा बदलीचे : अधिकाऱ्यांचे परस्परांकडे अंगुलीनिर्देश

प्रशांत देसाई भंडाराजिल्हा परिषदने ११७ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या केल्या. यात अनियमितता असल्याने अपात्र शिक्षकांच्या बदल्या रद्द करून त्यासंबंधात ३० एप्रिलपूर्वी जिल्हा परिषदने कारवाई करवी असा आदेश विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी बजावले होते. मात्र, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके यांनी यात खोडा घातल्याने ही प्रक्रिया थांबली आहे.जिल्हा परिषद भंडाराच्या सामान्य प्रशासन विभाग, शिक्षण विभागाच्या ‘सहयोगातून’ ११७ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र, याबदल्यांमध्ये शासकीय नियमाला डावलण्यात आल्याचा आरोप ज्ञानेश्वर दिपटे यांनी केला होता. याची तक्रार दिपटे यांनी विभागीय आयुक्त अनूपकुमार यांना केली होती. या प्रकरणाची चौकशी केली असता बदल्या प्रकरणात शासकीय नियम बाजूला सारून बदल्या करण्यात आल्याचे आढळून आले. यामुळे विभागीय आयुक्त अनूपकुमार यांनी या बदल्यांमध्ये अनियमितता करण्यात आल्याने त्या रद्द करण्यात आल्याचे आदेश बजावले. याबाबत त्यांनी जिल्हा परिषदने ३० एप्रिलपूर्वी तातडीने कारवाई करून त्याचा अहवाल मागविला होता. मात्र, जिल्हा परिषदने यावर अद्याप कुठलीही कारवाई केलेली नसल्याचे समोर आले आहे. यावरूनच जिल्हा परिषदन प्रशासनाने विभागीय आयुक्तांच्या आदेशाला धुळकावल्याचे दिसून येते. या प्रकरणात सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके यांनी महत्वाची भूमिका निभविल्याची चर्चा आता जि. प. त रंगू लागल्या आहेत. शिक्षण विभगातील कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन सुधीर वाळके यांनी नियमबाह्य बदल्या केल्याचे दिसून येत आहे. याबात प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याबाबत वाळके यांच्याशी संपर्क साधला असता तो हाऊ शकला नाही.वाळकेंनी थांबविली अंमलबजावणीची फाईलआदेशाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिने शिक्षणाधिकारी (प्राथ.) रविकांत देशपांडे यांनी सर्व बदल्या रद्द करण्यासंदर्भात उप मुख्य कार्यकारी अधिकारी वाळके यांच्याकडे फाईल सादर केली. मात्र, वाळके यांनी या फाईलवर स्वाक्षरीस विरोध केला. ३० एप्रिलपूर्वीपासून ही फाईल वाळके यांच्याकडे पडून असल्याचे समजते. सामान्य प्रशासन विभागातून सर्व प्रकारच्या फाईल पुढे जात असल्याने बदल्यासंदर्भात वाळके यांचा वाटा असल्याची कुजबूज जि.प.त आहे.जि.प.त धडकले शिक्षक आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्या रद्द झाल्या. यामुळे अनेक शिक्षकांच्या बदल्या वांद्यात आल्या आहेत. यात अधिकारी, कर्मचारी व काही पदाधिकारी यांनी ‘दलाली’ घेऊन शिक्षकांच्या बदल्या करविण्यात महत्वाची भूमिका निभवली आहे. त्यामुळे अनेकांनी घेतलेले पैसे परत करावे लागेल, या भितीपोटी उडवाउडवीचे उत्तरे देत आहेत. तर काहींनी मोबाईल बंद ठेवले आहेत.पात्र-अपात्रमध्ये अडकले सर्वशिक्षकांच्या बदल्यांमध्ये आता जि.प. प्रशासनाने पात्र-अपात्र असा मार्ग काढला आहे. मात्र, पात्र व अपात्र शिक्षक ठरविणार कोण? व त्यासाठी कोण पुढाकार घेणार? यावरून शिक्षण व सामान्य प्रशासनाचे अधिकारी एकमेकांवर ताशेरे ओढत आहेत. ज्या अधिकाऱ्यांनी शिक्षकांना पात्र ठरवून बदल्यांच्या प्रक्रियेत सामावून घेतले. यातील काहींवर अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार आहे. याला जिल्हा परिषद प्रशासनाचा तुघलकी कारभार जबाबदार राहणार आहे.