शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
4
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
5
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
6
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
7
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
8
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
9
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
10
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
11
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
12
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
13
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
14
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
15
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
16
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
17
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
18
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
19
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
20
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने ८१ घरांची पूर्णत: तर १२०४ घरांची अंशता पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST

गुरूवारी जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस बरसला. अलिकडच्या काही वर्षातील हा सर्वात मोठा पाऊस होता. अवघ्या २४ तासात १६३ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाने जिल्ह्यातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून शेती पिकांचेही नुकसान झाले. साकोली तालुक्याला सर्वाधिक पावसाचा फटका बसला. या तालुक्यातील ६६ घरांचे पूर्णत: नुकसान झाले असून ५०३ घरे अंशत: बाधीत आहेत.

ठळक मुद्देपावसाचा कहर । २६ प्रकल्प ओव्हर फ्लो, ६३ प्रकल्पात ७५.२४ टक्के जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात गुरूवारी झालेल्या अतिवृष्टीत ८१ घरे पूर्णत: उद्वस्त झाली. तर १२०४ घरांचे अंशत: नुकसान झाले. या पावसाने जिल्ह्यात हाहाकार उडाला असून शेती नुकसानीचे सर्व्हेक्षण महसूल आणि कृषी विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. या पावसाने जिल्ह्यातील २६ प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असून ६३ प्रकल्पात ७५ टक्के जलसाठा झाला आहे.
गुरूवारी जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस बरसला. अलिकडच्या काही वर्षातील हा सर्वात मोठा पाऊस होता. अवघ्या २४ तासात १६३ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाने जिल्ह्यातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून शेती पिकांचेही नुकसान झाले. साकोली तालुक्याला सर्वाधिक पावसाचा फटका बसला. या तालुक्यातील ६६ घरांचे पूर्णत: नुकसान झाले असून ५०३ घरे अंशत: बाधीत आहेत. लाखांदूर तालुक्यातील सात घरांचे पूर्णत: तर १२७ घरांचे अंशत: नुकसान झाले. मोहाडी तालुक्यात सात घरांचे पूर्णत: तर ३२५ घरांचे अंशत: नुकसान झाले. अनेक घरांच्या भींती आणि छत कोसळले. अनेकांचा आसरा हिरावला. प्रशासनाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात येत आहे. या पावसाने धान पिकाला मोठा फटका बसला. शेकडो हेक्टरवरील पीक पाण्याखाली आले. सर्व्हेक्षणानंतर नेमके किती नुकसान झाले, याची माहिती उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यात गत दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने नदीनाल्यांना पूर आला असून प्रकल्पात मुबलक जलसाठा निर्माण झाला आहे. भंडारा पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या ६३ प्रकल्पांपैकी २६ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. सध्या ६३ प्रकल्पांमध्ये ७५.२४ टक्के जलसाठा असून ९१.६२ दलघमी उपयुक्त साठा आहे.
भंडारा जिल्ह्यात गुरुवारी व शुक्रवारी पावसाने कहर केला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या आसपासच्या शेतात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. तसेच मासेमारांचेही मोठे नुकसान झाले. जिकडे बघावे तिकडे स्थिती जलमय दिसत होती. भंडारा पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या ६३ प्रकल्प आहेत. यात चार मध्यम, ३१ लघु तर २८ जुने मालगुजारी तलावाचा समावेश आहे. दोन दिवसाच्या मुसळधार पावसानंतर मध्य प्रकल्प असलेल्या चांदपूरमध्ये ७५.५३ टक्के, बघेडा ९१.८६, बेटेकर बोथली ६६.२३ व सोरणा प्रकल्प ३४.८३ टक्के असा एकुण ७१.१५ टक्के जलसाठा आहे.

ओव्हर फ्लो झालेले प्रकल्प
गुरुवारी व शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने कहर केल्याने जिल्ह्यात पूरमय परिस्थिती निर्माण झाली. यामुळे जिल्ह्यातील कवलेवाडा, परसवाडा, डोंगरला, कारली, नागठाणा, टांगा, मंडनगाव, सिल्ली आंबाडी, गुढरी, रेंगेपार कोढा, एकोडी, चांदोी, आमगाव, वलमाझरी, पिंडकेपार, पाथरी, परसोडी, लवारी, उमरी, सितेपार, सानगडी, रेंगेपार कोहळी, कनेरी, चान्ना, चप्राड आणि इंदोरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.

३१ लघु प्रकल्पांमध्ये ७१.७१ तर २८ जुने मालगुजारी तलावात ८९.८१ टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. यापैकी आठ प्रकल्पांमध्ये २५ ते ५० टक्के जलसाठा असून १४ प्रकल्पात ५० ते ७५ टक्के जलसाठा आहे. १५ प्रकल्पात ७५ ते ९९ टक्के जलसाठा आहे.

टॅग्स :Rainपाऊस