शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
3
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
4
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
5
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
6
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
7
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
8
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
9
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
10
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
11
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
12
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
13
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
14
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
15
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
16
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
17
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
18
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
19
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
20
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडी तालुक्यावर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: July 10, 2014 23:27 IST

मोहाडी तालुक्यातील खरीप हंगावर दुष्काळाची गळद छाया पसरलेली दिसत आहे. पाऊस बेपत्ता झाल्याने उन्हाचा चटका पऱ्ह्यांना बसला. आतातर फक्त पऱ्ह्यांचा वाळलेला कचराच परखणीत पाहावयास मिळत आहे.

करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील खरीप हंगावर दुष्काळाची गळद छाया पसरलेली दिसत आहे. पाऊस बेपत्ता झाल्याने उन्हाचा चटका पऱ्ह्यांना बसला. आतातर फक्त पऱ्ह्यांचा वाळलेला कचराच परखणीत पाहावयास मिळत आहे. धुऱ्यावरील तूर, तिळ व अन्य पिके वाळून तण झाली आहेत. दुबार पेरणीसाठी सुद्धा शेतकऱ्यांकडे पैसा व धान्य शिल्लक नाहीत, अशी अवघड अवस्था तालुक्यातील शेतकऱ्यांची आहे. शासनाच्या मदतीवरच दिवस काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे.
खरीप हंगाम सन २०१४ मधील पिक निहाय पेरणी झालेल्या क्षेत्रऋाचा अहवाल मोहाडी तालुक्यात १०० टक्के खरीप पिकांची पेरणी व लागवड पूर्ण झालेली आहे. भात नर्सरी रोपे ३२५५.८ हे.आर. क्षेत्रावर लावली गेली आहेत. आवत्या ४० हे.आर. तर रोवणी खालील क्षेत्र ३२५१८ हे.आर. आहे. एकूण भात पिकाखालील क्षेत्र ३२५५८ हे.आर. आहे.
खरीप तृणधान्यामध्ये बांध्यावरील तुर १२७७ हे.आर., तीळ १० हे.आर, सोयाबीन ४५.५० हे.आर. क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहेत.
भाजीपाला १५, केळी, मसाला व इतर पिकाखालील क्षेत्र ७६ तर खरीप ऊस लागवड क्षेत्र ६७२ हे.आर. आहे. एकूण खरीप पिकाखालील क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केल्यास ३४८६९ हे.आर. क्षेत्रावर विविध पिकांची लागवड, पेरणी झालेली आहे.
सध्या स्थितीचा अंदाज घेतल्यास १०० टक्के पेरणी व लागवड पूर्ण झालेल्या आहेत. मात्र वरूणराजा बळीराजावर रूसून बसला आहे. आशाळभूत नजरेने शेतावर जाणाऱ्या बळीराजाचे डोळे आकाशाकडे वळताच पांढरेच पांढरे ढग दिसल्यास त्याच्या जीवात जीव राहत नाही. शेतीत केलेली मेहनत फळाला येण्यापूर्वीच नष्ट झालेली पाहून डोळे अश्रृंनी भरून पाहत आहेत. शेतीत केलेली मेहनत वाया जाण्याच्या मार्गावर आहे.
प्रत्येक दिवस कडक उन्हाने उजाळत आहे. कुठेही पावसाची चिन्हे दिसत नाही. उन्हाच्या कडाक्याने धानाचे पऱ्हे वाळली आहेत. परखनीत तर पऱ्ह्यांच्या वाळलेला तणस दृष्टीस पडतो. बांध्याच्या धुऱ्यावर लावलेली पिके सुद्धा करपून वाळली आहेत. (वार्ताहर)