नवजात बालकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीतर्फे आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:39 IST2021-01-16T04:39:24+5:302021-01-16T04:39:24+5:30

भंडारा : जिल्हा रुग्णालयातील विशेष नवजात अतिदक्षता कक्षात लागलेल्या आगीत दहा निष्पाप बालकांचा जीव गेला. ही घटना अत्यंत वेदनादायी ...

Dr. newborns. Tribute by Babasaheb Ambedkar Jayanti Samiti | नवजात बालकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीतर्फे आदरांजली

नवजात बालकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीतर्फे आदरांजली

भंडारा : जिल्हा रुग्णालयातील विशेष नवजात अतिदक्षता कक्षात लागलेल्या आगीत दहा निष्पाप बालकांचा जीव गेला. ही घटना अत्यंत वेदनादायी व काळीज चिरणारी आहे . या घटनेने समाजमन सुन्न झाले. अग्नीतांडवात बळी पडलेल्या दहा निष्पाप जीवांना बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समारोह समितीच्या वतीने गांधी चौकात आदरांजली वाहण्यात आली. दोन मिनिटे मौन संवेदना व श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. मेणबत्ती प्रज्वलित करून मृत पावलेल्या बालकांच्या कुटुंबीयांना बळ मिळो यासाठी प्रार्थना करण्यात आली. या प्रसंगी समितीचे अध्यक्ष सचिन बागडे, प्रशांत सूर्यवंशी, अमृत बन्सोड, तुषार इलमकर, विनीतकुमार देशपांडे, महादेवराव मेश्राम, गुलशन गजभिये, ॲड. डी. के. वानखेडे, आहूजा डोंगरे, अजय तांबे, हेमा गजभिये, संजय मते, माधवी बन्सोड, भास्कर सुखदेवे, आशु गोंडाणे, मंजुषा चव्हाण, श्रद्धा डोंगरे, पायल सतदेवे, दुर्गा गजभिये, शुभम मेश्राम, नरेंद्र बन्सोड, निखिल वाहने, किशोर शिंदे, विपुल रोडगे, संजय शिंगाडे, अरविंद गोंडाणे, शरद खोब्रागडे, आसीत बागडे, नरेंद्र खोब्रागडे, कार्तिक तिरपुडे, सुधीर खोब्रागडे, देवानंद नंदागवळी, रंजित गणवीर आदी उपस्थित होते.

Web Title: Dr. newborns. Tribute by Babasaheb Ambedkar Jayanti Samiti