ट्रॅक्टरच्या शेत चिखलणी भाड्यात दुपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 05:00 AM2020-07-16T05:00:00+5:302020-07-16T05:00:51+5:30

यंदाच्या खरीप हंगामात लाखांदूर तालुक्यात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. शेतात रोवणीयोग्य पाण्यासाठी शेतकºयांनी कृषी वीज पंपाद्वारे कालव्याचे पाणी घेऊन रोवणीला प्रारंभ केला आहे. शेतात रोवणी योग्य पाण्याची साठवण होताच शेतकऱ्यांनी चिखलणीसाठी ट्रॅक्टर मालकांकडे धाव घेऊन चिखलणीची कामे देखील सुरू केली आहे.

Doubling in tractor farm mud rent | ट्रॅक्टरच्या शेत चिखलणी भाड्यात दुपटीने वाढ

ट्रॅक्टरच्या शेत चिखलणी भाड्यात दुपटीने वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देइंधन दरवाढीचा फटका : शेतकऱ्यांवरील संकट संपता संपेना

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : धान उत्पादनात अग्रेसर समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील चौरास भागासह अन्य भागातही प्रामुख्याने ट्रॅक्टरद्वारे शेती हंगाम केला जातो. सध्या खरीपातील धान रोवणीला वेग आला असून सर्वत्र शेतात ट्रॅक्टरने चिखलणीचे काम सुरू आहे. मात्र ऐन हंगामातच शासनाने डिझेल-पेट्रोल इंधनाचे दरात अचानक वाढ केली. त्यामुळे ट्रॅक्टर धारकांनी चिखलणीच्या भाड्यात दुप्पटीने वाढ केली आहे. याचा जबर फटका शेतकऱ्यांना बसला असून शेतकऱ्यांचे अंदाजपत्रक बिघडले आहे.
यंदाच्या खरीप हंगामात लाखांदूर तालुक्यात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. शेतात रोवणीयोग्य पाण्यासाठी शेतकºयांनी कृषी वीज पंपाद्वारे कालव्याचे पाणी घेऊन रोवणीला प्रारंभ केला आहे. शेतात रोवणी योग्य पाण्याची साठवण होताच शेतकऱ्यांनी चिखलणीसाठी ट्रॅक्टर मालकांकडे धाव घेऊन चिखलणीची कामे देखील सुरू केली आहे.
सातत्याने पीक कर्ज घेऊन हंगामी शेती करणारा शेतकरी लॉकडाऊनमध्ये पुरता खचला असताना खरिपातील शेती हंगामात झालेली दरवाढ शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी ठरली आहे. दरम्यान शेती उत्पादन खर्चावर आधारित मूल्य उत्पादीत मालांना भेटत नसल्याने तसेही शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण नियमित होत असल्याचे दिसून येते.
सध्याची दरवाढ हलाखीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना व मजुरांना असह्य वेदनादायी ठरल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी शासनाने तत्काळ दखल घेऊन ट्रॅक्टर चिखलणी भाड्यात दुप्पटीने झालेली दरवाढ कमी करण्यासाठी डिझेल-पेट्रोल इंधनाचे दर तात्काळ कमी करण्याची मागणी ट्रॅक्टर मालकांसह शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा शेतकऱ्यांचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांची बाजू समजून घ्यावी.

दरवाढीने शेतकऱ्यांचे अंदाजपत्रक बिघडले
पंधरवड्यापूर्वी डिझेल पेट्रोलचे दर स्थिर असताना ट्रॅक्टर मालक चिखलणीचे प्रती एकर बाराशे ते पंधराशे रुपये ट्रॅक्टर भाडा घ्यायचे. मात्र डिझेल पेट्रोल इंधन दरवाढ झाल्याने ट्रॅक्टर मालकांनी सदरच्या भाड्यात दुपटीने वाढ करुन प्रति एकरी २८०० ते तीन हजार रुपये भाडा केल्याची माहिती अनेक शेतकऱ्यांनी दिली. सध्या डिझेलचे दर प्रति लिटर ७८ ते ८० रुपये आहे. प्रती एकर चिखलणीसाठी जवळपास २५ ते ३० लिटर डिझेल लागत असल्याने ट्रॅक्टर मालकानी ट्रॅक्टर चिखलणी भाड्यात केलेली दरवाढ योग्य असल्याचे एका ट्रॅक्टर मालकाने सांगतांनाच शासनाच्या इंधनाच्या दरवाढ विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Web Title: Doubling in tractor farm mud rent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.