शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीराम जन्मोत्सवासाठी जिल्हा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2022 05:00 IST

भंडारा शहरात श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीने श्रीराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गत तीन दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्ती गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. भंडारा येथे रविवार १० एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. खामतलाव परिसरातून या शोभायात्रेला प्रारंभ होणार असून यात चित्ररथ, देखावे आदी सहभागी होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : श्रीराम जन्मोत्सवासाठी संपूर्ण जिल्हा सज्ज झाला असून ठिकठिकाणच्या श्रीराम मंदिरावर आकर्षक रोषणाई आणि चौकाचौकांमध्ये भगव्या पताका लावल्या आहेत. कोरोना संसर्गाच्या दोन वर्षांनंतर सार्वजनिक उत्सव साजरा करण्यात येत असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून रविवार १० एप्रिल रोजी भंडारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. भंडारा शहरात श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीने श्रीराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गत तीन दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्ती गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. भंडारा येथे रविवार १० एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. खामतलाव परिसरातून या शोभायात्रेला प्रारंभ होणार असून यात चित्ररथ, देखावे आदी सहभागी होणार आहेत. मोठा बाजार परिसरातील श्रीराम मंदिरात जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून रविवारी दुपारी १२ वाजता रामजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येकाने आपल्या घरावर भगवा झेंडा लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शोभायात्रेदरम्यान नागरिकांसाठी पाणी, शरबत आणि महाप्रसादाचे स्टॉल लावून सहकार्याचे आवाहन केले आहे.तुमसरमध्ये तरुणांचा पुढाकारतुमसर शहरातील तरुणांनी धूमधडाक्यात श्रीराम नवमी उत्सव साजरा करण्याची तयारी सुरू केली आहे. रविवारी आयोजित शोभायात्रेत नागपूर, रायपूर येथील चित्ररथांसह बॅन्ड पथक सहभागी होणार आहे. यावर्षी मराठा सेवा संघ, संताजी युवा मंडळ, पोवार समाज, ब्राह्मण समाज, ज्ञानेश्वरी मंडळ, नवदुर्गा उत्सव सेवा मंडळ यांचे चित्ररथ राहणार आहे.

साकोलीत सर्वपक्षीय आयोजन- साकोली येथे रविवार १० एप्रिल रोजी सर्वपक्षीय श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता सेंदूरवाफा येथील गजानन महाराज मंदिरातून शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. शहरातील मुख्य मार्गावरून ही शोभायात्रा काढण्यात येणार असून श्रीराम भक्त हनुमान मंदिर तलाव येथे समारोप होणार आहे. विविध देवस्थानचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक संघटना जन्मोत्सवाच्या तयारीला लागले आहेत.

 

टॅग्स :Ram Navamiराम नवमी