शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा पोलीस दलाची दारु व जुगार अड्ड्यांविरुद्ध मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 05:00 IST

भंडारा जिल्हा पोलीस दलाची सुत्रे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी हाती घेतली आणि अवैध धंद्याविरुद्ध धडक मोहीम राबविण्याचे आदेश दिले. अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण आणि संबंधित पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांनी गत महिनाभरापासून धाडसत्र सुरु केले आहे.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेचा पुढाकार

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटण करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने कंबर कसली असून गत महिनाभरापासून जिल्ह्यातील विविध ठिकाणी दारु व जुगार अड्यांवर धाडी टाकल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्याच्या मदतीने जिल्हाभर मोहीम सुरु आहे. यामुळे अवैध व्यवसायीकांचे धाबे दणाणले आहेत.भंडारा जिल्हा पोलीस दलाची सुत्रे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी हाती घेतली आणि अवैध धंद्याविरुद्ध धडक मोहीम राबविण्याचे आदेश दिले. अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण आणि संबंधित पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांनी गत महिनाभरापासून धाडसत्र सुरु केले आहे. साकोली, वरठी, सिहोरा, करडी, जवाहरनगर, आंधळगाव, मोहाडी, पवनी, दिघोरी, लाखांदूर, कारधा, अड्ड्याळ, बरवाही यासह सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत धाडी टाकण्यात येत आहे. सिहोरा आणि गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक दिवस आड धाडी टाकून अवैध धंद्यांचा बिमोड केला जात आहे. बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेने वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनुली नाल्यावर धाड टाकली. त्या ठिकाणी हातभट्टी उध्वस्त करण्यात आली. आरोपी विमलाकर किसन लोणारे रा.वरठी याच्या ताब्यातुन ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यासोबत साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकोडी परिसरात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारु गाळली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरुन एकोडी येथे धाड मारली असता आरोपी गुरुचरण तुलाराम उके रा.एकोडी याच्याजवळून दारु गाळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. जिल्ह्यातील विविध ठिकाणी दारु विरुद्ध मोहीम सुरु असल्याने हातभट्टी दारु काढणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.  साकोलीत सट्टापट्टीवर धाड भंडारा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी साकोली येथील एका सट्टापट्टीवर धाड मारुन दोघांना अटक केली. ताराचंद बकाराम राहुले रा.आंबेडकर वाॅर्ड सावरबंध आणि कैलाश खांडेकर रा.साकोली अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याजवळून राजधानी, कुबेर मटक्यांचे आकडे लिहिलेली पट्टी आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. 

टॅग्स :Policeपोलिसliquor banदारूबंदी