'त्या' कृषी कायद्याविरोधात जिल्हा काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 05:00 AM2020-12-04T05:00:00+5:302020-12-04T05:00:31+5:30

सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून आंदोलनाची सुरवात करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली व हा शेतकरी विरोधक कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी प्रेमसागर गणवीर, ॲड. शिशिर वंजारी, धनराज साठवणे, डॉ. विनोद भोयर, प्रेम वनवे, अजय गडकरी, मनोज बागडे, धनंजय तिरपुडे, अनिक जमा पटेल, सोहेल अहमद, राजकपूर राऊत, प्रसन्ना चकोले आदी उपस्थित होते.

District Congress agitation against 'that' agricultural law | 'त्या' कृषी कायद्याविरोधात जिल्हा काँग्रेसचे आंदोलन

'त्या' कृषी कायद्याविरोधात जिल्हा काँग्रेसचे आंदोलन

googlenewsNext

  लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी संदर्भात पारीत केलेल्या तीन कृषी विषयक काळ्या कायद्यांच्या विरोधात जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वात गुरुवार रोजी त्रिमूर्ती चौकात आंदोलन करण्यात आले.
सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून आंदोलनाची सुरवात करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली व हा शेतकरी विरोधक कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. 
याप्रसंगी प्रेमसागर गणवीर, ॲड. शिशिर वंजारी, धनराज साठवणे, डॉ. विनोद भोयर, प्रेम वनवे, अजय गडकरी, मनोज बागडे, धनंजय तिरपुडे, अनिक जमा पटेल, सोहेल अहमद, राजकपूर राऊत, प्रसन्ना चकोले आदी उपस्थित होते.
केंद्र सरकारने कृषी व शेतकरी संदर्भात पारीत केलेल्या तीन कृषी विषयक काळ्या कायद्यांच्या विरोधात देशातील शेतकरी निदर्शने व आंदोलन करीत आहेत. या संदर्भात दिल्लीच्या सिमेवर शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन उभे केलेले आहे. न्याय मागण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत. परंतू केंद्र सरकार त्याचे न ऐकता त्यांना अमानुष अशी वागणूक दिली जात आहे. त्या आंदोलनामध्ये एक शेतकरी दगावलेला आहे. या घटनेच्या निषेधार्त त्या आंदोलनाला पाठींबा देण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने घेतलेला आहे. त्यांच्या आदेशावरून भंडारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी जयश्री बोरकर, सुभाष वाडीभस्मे, प्यारेलाल वाघमारे, प्रशांत देशकर, राजू निर्वाण, विनीत देशपांडे, रिजवान काजी, नाहेद परवेज, अभिजित वंजारी, कोमल साठवणे, संजय भोवते, महेश नान्हे, पवन मेश्राम, किशोर राऊत, संजय वरगणटीवार, निखील तिजारे, सुनंदा धनजोडे, संध्या धांडे लाखनी, महेंद्र वाहणे, सचिन फाले, सुरेश गोन्नाडे, मंगेश हुमणे, जागेश्वर बडगे, सचिन हिंगे, मुलचंद ईश्वरकर, मुन्ना भोंगाडे, विलास मोथरकर, बंडू धोटे, बंडू लांजेवार,उमेश लांजेवार, शाहीन मून, आनंद चिंचखेडे, शाहीन मेश्राम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: District Congress agitation against 'that' agricultural law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती