अपुऱ्या ज्ञानामुळे अधिकाऱ्यांची फजिती

By Admin | Updated: June 10, 2015 00:29 IST2015-06-10T00:29:45+5:302015-06-10T00:29:45+5:30

महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यात सुरू असलेल्या कामांची पाहणी करीता आलेल्या केंद्रीय ...

Dishonesty of officials due to insufficient knowledge | अपुऱ्या ज्ञानामुळे अधिकाऱ्यांची फजिती

अपुऱ्या ज्ञानामुळे अधिकाऱ्यांची फजिती

सरपंच महिलेने दिली माहिती : केंद्रीय सहसचिवांनी केली रोजगार हमी योजनांच्या कामांची पाहणी
लाखांदूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यात सुरू असलेल्या कामांची पाहणी करीता आलेल्या केंद्रीय चमुपुढे तालुक्यातील अधिकाऱ्याने पुढे येवून माहिती देण्याचे टाळल्याने अखेर सोनी येथील महिला सरपंच व मजुरांनी माहिती देवून तालुका अधिकाऱ्यांचे रोहयोचे अपुऱ्या ज्ञानाचे पितळ उघडे पाडल्याचा धक्कादायक प्रकार सोनी येथे उघडकीस आला.
लाखांदूर तालुक्यातील सोनी येथे रोहयो अंतर्गत भातखचऱ्या काम सुरू आहे. याच दरम्यान भारत सरकारचे सहसचिव मग्रारोहयो हमी योजना (नरेगा) आर. सुब्रमण्यम यांनी अचानक दुपारी भेट दिली. यावेळी राज्याचे रोहयो आयुक्त मुत्थू क्रिष्णन, जिल्हाधिकारी धीरज कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी निंबाळकर, तत्कालीन सीईओ राहुल द्विवेदी, लाखांदूरचे तहसिलदार विजय पवार, खंडविकास अधिकारी विजय झिंगरे, सर्व तांत्रिक अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हा सहायक कार्यक्रम अधिकारी (रोहयो) मांढरे उपस्थित होते.
दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी धिरजकुमार यांनी लाखांदूर तालुक्याला भेट देवून रोहयो अंतर्गत अनेक कामांची पाहाणी केली. समाधानकारक कामे नसल्याने तसेच समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने तालुका अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. याचाच धसका घेत आज प्रत्येक केंद्र सरकारच्या चमुने रोहयो अंतर्गत सोनी येथील भातखचऱ्याच्या कामावर भेट दिली असता एकाही अधिकारी व कर्मचारी पुढे येवून माहिती देण्यास धजत नसल्याचे दिसून आल्याने अखेर सोनी येथील सरपंच सविता दुपारे, जिल्हा कार्यअधिकारी रोहयो परिपूर्ण माहिती सांगितली.
खरे पाहता केंद्रीय चमुला तालुक्यातील रोहयो कामाची माहिती पुरविण्याची जबाबदारी खंडविकास अधिकारी, तहसिलदार तांत्रिक पॅनल अधिकारी, रोजगार सेवक यांची दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचा धसका घेतल्याने सर्व अधिकाऱ्यांनी मजूरांच्या मागे रांगेत उभे राहून निमुटपणे ऐकून घेत असल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांना भातखचऱ्या अंतर्गत माती कामाची गरज का, यासह सचिवांच्या प्रश्नाला सम्पर्क उत्तर देण्यास एकही अधिकारी पुढे धोका नाही.
अखेर मजुरांनीच उत्तर देवून अधिकाऱ्यांची बाजू सांभाळून नेली. सहसचिव सुभ्रमण्यम यांनी हेक्टरी उत्पन्न वाढीसाठी शासनाकडून कोणते उपाय योजना करणे गरजेचे आहे असा प्रश्न शेतकऱ्यांना केला असता औषध धानाची बियाणे, खताचे दर कमी झाले पाहिजेत व धान्याला योग्य दर मिळायला पाहिजे या सूचना मजूरांनी व शेतकऱ्यांनी केल्या.
लाखांदूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून ताण मारणारे अधिकारी आज मात्र मुंग गिळून गप्प बसल्याचे चित्र सर्वसामान्यांनी प्रत्येक्ष घेण्याचे सांगितले. त्यामुळे रोहयोच्या कामाची योग्य व सदोष माहिती उपलब्ध होवू शकली नाही. (तालुका प्रतिनिधी)

अधिकाऱ्यांचे चष्मे व गॉगल्स मॅनमध्ये
दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेला लाखांदूर दौरा चांगलाच चर्र्चेत होता. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चष्मे व गॉगल्स वापरून जिल्हाधिकाऱ्यापुढे उभे राहून हुशारकी मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: चष्मे व गॉगल्स काढून भिरकावून फेकले व शिस्तीचे धडे दिले. मधे मधे बोलणाऱ्यांची बोलती बंद केली याचाच धस्का घेत आज मात्र एकही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे चष्मे व गॉगल्स त्यांचे जवळ दिसून आले नसल्याने हा विषय चर्चेचा ठरला.

Web Title: Dishonesty of officials due to insufficient knowledge