शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

पेपर तपासणीचे थेट प्रक्षेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 06:00 IST

परीक्षा आटोपल्यानंतर उत्तरपत्रिका थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आली. त्याठिकाणी तपासणी करुन अंतीम निकाल लावला गेला. मात्र यासाठी अतिरिक्त दक्षता घेण्यात आली. भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी म्हणून चक्क ओएमआर सीटची अर्थात पत्रिकांची तपासणीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हा परिषद नोकरभरती : महिन्याभरापूर्वी परीक्षेत घोळ झाल्याने प्रशासनाने घेतली दक्षता

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषदेच्या नोकरी भरतीत घोळ झाल्याने रद्द झालेली परीक्षा गुरुवारी पुन्हा घेऊन परीक्षेतील उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. एकाच दिवशी परीक्षा आणि त्याच दिवशी निकाल घोषित करुन ही प्रक्रिया पारदर्शीपणे राबविण्याची दक्षता प्रशासनाने घेतली.भंडारा जिल्हा परिषदेच्या नोकरी भरतीसाठी १२ जानेवारी रोजी परीक्षा घेण्यात आली होती. कनिष्ठ अभियंता आणि अंगणवाडी पर्यवेक्षीका या पदासाठी ही परीक्षा घेण्यात आली. मात्र या परीक्षेत घोळ झाल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. त्यानंतर परीक्षा घेणाऱ्या कंपनीचे अधिकारी आणि अपेक्षेपेक्षा जास्त गुण घेणाºया चार अशा आठ जणांविरुध्द भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी एका पत्रकारपरिषदेत ही परीक्षा रद्द झाल्याचे सांगत ३० जानेवारी रोजी नव्याने परीक्षा घेणार असल्याचे सांगितले. त्यानुसार गुरुवारी ही परीक्षा शहरातील दोन केंद्रावर घेण्यात आली.परीक्षा आटोपल्यानंतर उत्तरपत्रिका थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आली. त्याठिकाणी तपासणी करुन अंतीम निकाल लावला गेला. मात्र यासाठी अतिरिक्त दक्षता घेण्यात आली. भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी म्हणून चक्क ओएमआर सीटची अर्थात पत्रिकांची तपासणीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एलईडी वॉल लावण्यात आली. याठिकाणी परीक्षा देणारे उमेदवार, सामान्य नागरिक, अधिकारी आणि कर्मचारी पेपर तपासणीचे थेट प्रक्षेपण पाहत होते. कदाचित अशा पध्दतीने थेट प्रक्षेपण करुन उत्तरप्रत्रिकांची तपासणी करण्याचा हा पहिलाच प्रयत्न असावा.तीन जागांसाठी भरती प्रक्रियाभंडारा जिल्हा परिषदेत तीन जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. ही भरती प्रक्रिया जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष एम. जे. प्रदीपचंद्रन यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली. शहरातील दोन केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली. गतवेळी झालेला घोळ पुन्हा होवू नये याची प्रत्येक ठिकाणी दक्षता घेण्यात आली. त्यासाठी जिल्हा परिषदेत नव्यानेच रुजू झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस यांनी यासाठी सहकार्य केले. या पारदर्शी परीक्षेच्या माध्यमातून खºया गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि परीक्षेत होणारी बोगसबाजी टाळली जावी हा प्रमुख उद्देश होता. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे थेट प्रक्षेपण कुतूहलाचा विषय झाला होता. शहरातही या परीक्षेच्या थेट प्रेक्षपणाची चर्चा दिवसभर रंगली होती.

टॅग्स :zpजिल्हा परिषदexamपरीक्षा