शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

धडक सिंचन विहिरी, मामा तलावांची कामे प्राथमिकतेच्या आधारावर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:41 IST

साकोली : धडक सिंचन विहिरीचे रखडलेले अनुदान त्वरित देण्यात येईल, मामा तलावांचे खोलीकरण व दुरुस्तीच्या कार्यात निधीची कमतरता पडू ...

साकोली : धडक सिंचन विहिरीचे रखडलेले अनुदान त्वरित देण्यात येईल, मामा तलावांचे खोलीकरण व दुरुस्तीच्या कार्यात निधीची कमतरता पडू देणार नाही. शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी शासन गंभीरतेने कार्य करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्यासोबत झालेल्या चर्चेवेळी ते बोलत होते.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार राजू कारेमोरे, आमदार चंद्रिकापुरे, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार राजेंद्र जैन, दिशा फाउंडेशनच्या अध्यक्ष सरीता फुंडे, मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, धनंजय दलाल, शेतकरी संघटनेचे प्रशांत पवार, जयंत वैरागडे, अंगराज समरीत, मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, प्रदीप मासुरकर, शैलेश गजभिये, सुरेश बघेल, फजील खान, राशिद कुरेशी, डॉ.राजेश चंदवानी, डाॅ.अनिल शेंडे, अनिल टेंभरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

सुनील फुंडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या सिंचन सोयीसंबंधीचे निवेदन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना देण्यात आले. जिल्ह्यातील धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत १३ हजार सिंचन विहिरींना मंजुरी देण्यात आली. मात्र, मागील एक वर्षापासून विहिरीचे अनुदान रखडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे, तसेच जिल्ह्यातील मामा तलावांची दुरवस्था बघता तलाव खोलीकरण व नहरांची दुरुस्तीची कामे तातडीने करण्यात यावी, अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. याप्रसंगी सुनील फुंडे यांच्याकडून ना.पाटील व व रूपाली चाकणकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.