नैराश्य ही सर्वात मोठी कीड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:41 IST2021-02-05T08:41:28+5:302021-02-05T08:41:28+5:30

तुमसर : आजचे युग हे स्पर्धात्मक युग असून विद्यार्थ्यांनी नेहमी विचार करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विचार करावा, महापुरुषांचे चरित्र ...

Depression is the biggest pest | नैराश्य ही सर्वात मोठी कीड

नैराश्य ही सर्वात मोठी कीड

तुमसर : आजचे युग हे स्पर्धात्मक युग असून विद्यार्थ्यांनी नेहमी विचार करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विचार करावा, महापुरुषांचे चरित्र आत्मसात करावे, अपयशाने खचून स्पर्धकांनी संकुचित वृत्ती न बाळगता लोक काय म्हणतील़, याकडे लक्ष न देता व नैराश्य न बाळगता आपले कार्य सतत सुरू ठेवावे कारण नैराश्य ही सर्वात मोठी कीड आहे, असे प्रतिपादन शिल्पा खंडाईत यांनी केले.

स्थानिक न. प. नेहरू कनिष्ठ महाविद्यालय तुमसर येथील मराठी विभागाने आयोजित केलेल्या ऑनलाईन स्पर्धा मार्गदर्शन प्रशिक्षण वर्गाच्या शुभारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी चंद्रपूर येथील रवींद्र कावळे, नागपूर येथील निता खोत यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य भारत थोटे, प्रमुख अतिथी म्हणून संजय लेनगुरे, प्रभाकर शिंगणजुडे , कल्पना मलेवार, रमेश बोंद्रे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय लेनगुरे यांनी केले. संचालन भारती बघेले, तर आभार इशांत बडवाईक यांनी मानले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक मेटे, सतीश बडवाईक, मनोहर देशमुख, ममता पशिने, भावना राऊत, अलोक गुप्ता, ललिता रेहकवार, योगिता निमजे, इंदिरा पडोळे, मंगेश ढोके, ढबाले, लांजेवार, नंदनवार, भुजाडे, सतीश मलेवार, चंदा पडोळे, नरेंद्र पडोळे, कमाने यांनी प्रयत्न केले.

Web Title: Depression is the biggest pest