शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय प्रेरणा शिक्षण परिषद

By admin | Updated: September 19, 2016 00:43 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत नागपूर येथे दोन दिवसीय नागपूर विभागीय पर्यवेक्षिय अधिकारी व शिक्षकाच्या ....

शैक्षणिक प्रगती : भंडारा जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थितीभंडारा : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत नागपूर येथे दोन दिवसीय नागपूर विभागीय पर्यवेक्षिय अधिकारी व शिक्षकाच्या शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.प्रगत नावाच्या विचाराने झपाटलेल्या १ हजार क्षेत्रीय अधिकारी कर्मचाऱ्याची २० लाख विद्यार्थी प्रगत करण्याचे स्वप्न घेऊन निघालेली ही परिषद म्हणजे एक संवाद यात्राच होती. या परिषदेत नागपूर विभागातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा व नागपूर या जिल्ह्यातील क्रियाशील शिक्षक, साधनव्यक्ती, केद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, डाएटचे प्राचार्य सहभागी झाले होते.आपली शाळा प्रयत्नाने प्रगत करणाऱ्या विभागातील सहा जिल्ह्यातील सहा प्रगत शिक्षकांनी आपले विद्यार्थी कसे प्रगत होत गेले. सुलभ म्हणून आपण आपली भूमिका कशी पार पाडली हे तंत्र फलकावर प्रर्दशीत केले. केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, साधनव्यक्ती, गटशिक्षण अधिकारी, शिक्षणाधिकारी, प्राचार्य डायट यांनी आपापले कार्यक्षेत्र प्रगत करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपल्या कामाची दिशा समजावून सांगितली. आपण यशस्वी कसे होत आहोत, काय अडथळे आले, आपण त्यावर कशी मात केली आणि कसे विजयी झालो याचे वर्णन केले. या सादरीकरणात भंडारा जिल्ह्यातील नरेश नवखरे; साधन व्यक्ती, सविता उप्रिकर; केंद्र प्रमुख विरली तालुका लाखांदूर, सुकराम पडोळे; विस्तार अधिकारी, सानगडी, कैलास चव्हाण; शिक्षक, चिखला मराठी शाळा तुमसर आदींनी सादरीकरण केले. सर्वांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी दाद दिली. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रचे काम फार सकारात्मकरित्या सुरू आहे व कितीतरी नवे बदल शिक्षण प्रक्रियेत घडत आहेत, हे चित्र या सादरीकरणातून स्पष्ट झाले.जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीचा व कार्यक्रमाची दिशा शिक्षणाधिकारी सुवर्णलता घोडेस्वार यांनी कथन केली. शाळाबाह्य बालक मुक्त तालुका कसा कराल याचे स्वानुभव कथन डायटचे प्राचार्य अभय परिहार भंडारा यांनी केले. उपस्थित अधिकाऱ्यांना हे शक्य आहे, असा विश्वास प्राप्त करून दिला. साधनव्यक्ती चांगदेव सोरते आणि नरेश नवखरे याची अंतकरणातून काम करण्याची तळमळ सर्वांना प्रेरित करणारी आहे. शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांनी विदर्भ प्रगत व्हावा यासाठीचे सशक्त प्रेरक विचार आणि त्यांची उपस्थिती सर्वांना निश्चयाचे बळ देत देणारी होती. तर विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांचे नेटके आयोजन परिषद यशस्वी होण्याचे आणखी काही कारण होते. शिक्षण संचालक गोविंद नांदेडे समारोपात शुभेच्छा देत शिक्षण प्रक्रिया ही दु:खाची जत्रा न होता ती आनंद यात्रा व्हावी असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला गोविंद नांदेडे, धीरजकुमार, नागपूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, राज्य समन्वयक शाम मक्रमपूरे आदी उपस्थित होते. या विभागीय परिषदेचे संचालन स्मिता गालफाडे व मुकुंद ठवकर यांनी केले. (नगर प्रतिनिधी)