परसोडी येथे डेंग्यूची परिस्थिती आटोक्यात
By Admin | Updated: August 21, 2014 23:36 IST2014-08-21T23:36:28+5:302014-08-21T23:36:28+5:30
तालुक्यातील परसोडी येथे मागील एक महिन्यापासून ताप व डेंग्यूची लागण सुरु आहे. यात दोन बहिणींचा मृत्यू झाला. आरोग्य विभागातर्फे नागरिकांची काळजी घेण्यात येत आहे. तसेच गावात

परसोडी येथे डेंग्यूची परिस्थिती आटोक्यात
साकोली : तालुक्यातील परसोडी येथे मागील एक महिन्यापासून ताप व डेंग्यूची लागण सुरु आहे. यात दोन बहिणींचा मृत्यू झाला. आरोग्य विभागातर्फे नागरिकांची काळजी घेण्यात येत आहे. तसेच गावात या साथरोगावर आळा बसविण्यासाठी उपाययोजना सुरु आहे.
सध्या परसोडी येथील परिस्थिती आटोक्यात असली तरी दोन बहिणींच्या मृत्यूमुळे गावातील नागरिकांना भितीचे वातावरण आहे. परसोडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र विर्शी अंतर्गत शिबिर लावण्यात आले असून या शिबिरात डेंग्यूची व तापाची रक्ताची तपासणी करण्यात येत आहे. तसेच डेंग्यूचे रुग्ण आढळल्यास त्यांना उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे पाठविण्यात येत आहे. एक महिन्याच्या कालावधीत परसोडी येथे ४५ रुग्णांना तापाची लागण झाली तर सात जणांना डेंग्यूची लागण झाली होती. यापैकी भूमिता गोटेफोडे व निशा इरले या दोन बहिणींचा मृत्यू झाला तर यांचा भाऊ हा नागपूर येथे उपचार घेत आहे. तर उर्वरीत तिघांची प्रकृती बरी असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.थोटे यांनी सांगितले. परसोडी येथे डेंग्यूची लागण होताच आरोग्य विभागातर्फे डेंग्यूची उत्पत्ती होणारी अळीचा आधी नायनाट करण्यात आली. त्यानंतर आरोग्य विभाग, ग्रामपंचायत व नागरीकांच्या सहकार्याने साचलेल्या पाण् यात, नाल्यात, गोबरगॅसच्या खड्यात संडासच्या खड्यात गळलेले आईल व रॉकेल टाकण्यात आले. तसेच गावात एक दिवस कोरडा दिवस पाळण्यात यावे असे सांगून गावकऱ्यांना जागरूक करण्यात आले.सध्या या गावातील परिस्थिती आटोक्यात असून आरोग्य विभागातर्फे शिबिर लावण्यात आले आहे. मात्र गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)