शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

वादळग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी

By admin | Updated: July 2, 2014 23:14 IST

१० जून रोजी सायंकाळी अचानक जोरदार वादळासहित मुसळधार पावसामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक घरांचे छप्पर, कवेलू, टिनपत्रे उडून गेलेत, कित्येक घरांच्या भिंतींना तडे गेले.

कऱ्हांडला : १० जून रोजी सायंकाळी अचानक जोरदार वादळासहित मुसळधार पावसामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक घरांचे छप्पर, कवेलू, टिनपत्रे उडून गेलेत, कित्येक घरांच्या भिंतींना तडे गेले. हजारो वृक्षाची पडझड झाली. उन्हाळी धान पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. त्यामुळे लाखोची हानी झाली. लाखांदूर तालुक्यातील कऱ्हांडला, विरली बु., राजनी, विरली खुर्द, नांदेड, ईटान, दोनाड, रोहनी, खैरना, मोहरना, कुडेगाव, डोकेसरांडी, ओपारा, किरमटी आदी गावातील वादळग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जि.प. सदस्य मनोहर महावाडे यांनी केली आहे.विद्युत तारांची जोडणी करावी अशीही मागणी केलेली आहे. वादळाने विरली विद्युत उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या २२ गावातील झाडे विद्युत तारावर पडले. त्यामुळे विद्युत तारा आणि विद्युत खांब तुटल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झालेला आहे. २० दिवसांचा कालावधी लोटूनही अनेक शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा सुरू झालेला नाही. पावसाने डोळे वटारलेले असून पऱ्ह्यांना पाणी देण्याची समस्या शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे. मृग नक्षत्राच्या प्रारंभी जोरदार पावसाने हजेरी लावली. पाऊस चांगल्या प्रमाणात असून पावसाला सुरूवात झाली, असा अंदाज शेतकऱ्यांनी लावला. मोठ्या प्रमाणावर खरीप धान पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली. सध्या पाऊस थांबला असून पेरणी केलेले पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सिंचनाची सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांचे हाल कोरडवाहू शेतकऱ्याप्रमाणे झाले आहे. पऱ्हे जगविण्यासाठी सिंचनाची सुविधा व्हावी या हेतूने विद्युत वितरण कंपनीने तुटलेल्या विद्युत तारा आणि विद्युत खांब जोडणी करून विद्युत प्रवाह सुरू करावा, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे. (वार्ताहर)