शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

रोखपालाच्या उद्धट वागणुकीमुळे ग्राहक त्रस्त

By admin | Updated: March 28, 2015 00:29 IST

बँक आॅफ इंडिया शाखा कोंढा येथे आजूबाजूच्या २५ गावच्या लोकांचे खाते आहेत.

कोंढा (कोसरा) : बँक आॅफ इंडिया शाखा कोंढा येथे आजूबाजूच्या २५ गावच्या लोकांचे खाते आहेत. येथे दररोज १०.३० पासून ग्राहकांची पैसे काढणे, भरणे करिता प्रचंड गर्दी असते. बँकेत दुपारी पाय ठेवायला जागा नसते. अशावेळी ग्राहकांसोबत येथील रोखपाल उद्धट वागणूक करीत असतो. त्यामुळे सर्व ग्राहक त्यापासून त्रस्त आहेत.कोंढा परिरातील एकमेव राष्ट्रीय कृत बँक म्हणून बँक आॅफ इंडियाची शाखा आहे. या बँकेत पवनी तालुक्यातील अनेक गावच्या नागरिकांचे व्यवहार आहेत. व्यापारी, सेवानिवृत्त कर्मचारी, वृद्ध कर्मचारी स्त्री पुरूष सर्वाचे येथे खाते आहे. सकाळी १०.३० वाजता बँक उघडल्या बरोबर ग्राहक येथे गर्दी करतात. विड्राल करण्यासाठी ग्राहकांना एक ते दीड तास रांगेत उभे राहावे लागते. येथील रोखपाल तत्परतेने व्यवहार हाताळत नाही. काही विचारले तर उद्धतपणे ग्राहकांशी हुज्जत करीत राहतो. कधीकधी राग आल्यास कॅश काऊन्टर बंद करतो. विड्राल फार्म चुकला तर समजावून न सांगता तो फेकून देतो. डोळे काढून व मोठ्या आवाजात ग्राहकांशी भांडण करतो अशा अनेक तक्रारी ग्राहकांना आहेत. त्याची ग्राहकांशी वागणूक योग्य नाही. कॅशिअरच्या ग्राहकांशी अरेरावीच्या वागणुकीमुळे सर्वच ग्राहक त्रस्त आहेत. दररोज ते ग्राहकांशी हुज्जतबाजी करतात. त्यांच्या तक्रारी व्यवस्थापन व वरिष्ठ अधिकाऱ्यांना ेलेखी तक्रारीद्वारे केली. पण त्याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. कोंढा परिसरातील २५ ते ३० गावातील एकमेव बँक आहे. अनेक लोकांनी येथे मोठ्या ठेवी ठेवल्या आहेत. पण कॅशिअरच्या अरेरावीच्या वागण्यामुळे ग्राहकांनी या बँकेसी असलेले व्यवहार कमी केले आहे. पण तरी देखिल त्याच्या वागणुकीत बदल झाला नाही. बँक आॅफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कॅशिअरवर कारवाई करून त्याची बदली करण्याची मागणी अमित जिभकाटे व ज्ञानदेव कुर्झेकर यांनी केली आहे. (वार्ताहर)रोखपालच्या संबंधात माझ्याकडे ग्राहकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यांना समज देण्यात आली आहे. वरिष्ठांनी देखिल विचारणा केली आहे.- आनंद बावणे, व्यवस्थापक, बँक आॅफ इंडिया, कोंढा-कोसरा.